Raksha Bandhan 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2024 : भावा-बहिणीच्या घट्ट नात्यासाठी राशीनुसार बांधा राखी, होईल करिअरमध्ये प्रगती अन् वाढेल धन-दौलत

Rakhi According Zodiac Sign : यंदा रक्षाबंधनला भाऊरायाच्या प्रगतीसाठी आणि तुमचे नाते अजून घट्ट होण्यासाठी भावाच्या राशीनुसार त्याच्या मनगटावर राखी बांधा. तुमच्या भावाचे प्रगतीचे दार खुले होईल.

Shreya Maskar

सर्वत्र रक्षाबंधनचा माहोल तुम्हाला पाहायला मिळत आहे. बाजारपेठा विविध राख्यांनी सजल्या आहेत. बाजारात विविध रंगांच्या आणि आकाराच्या राख्या तुम्हाला पाहायला मिळतील. यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्टला आहे. हा सण भाऊ-बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या सुरक्षिततेची आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करते.

ज्योतिष शास्त्रानुसार, रक्षाबंधनला तुम्ही भावाच्या राशीनुसार त्याच्या मनगटावर राखी बांधल्यास भाऊरायाची करिअरमध्ये प्रगती होईल आणि धन-दौलत वाढेल.

मेष

तुमचा भाऊ जर मेष राशीचा असेल तर त्याला लाल रंगाची राखी बांधणे योग्य राहील. मेष राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे लाल रंग शुभ मानतात.

वृषभ

वृषभ राशीच्या भावांना निळ्या रंगाची राखी बांधावी. कारण राखीचा निळा रंग भावाच्या करिअरमध्ये प्रगती घेऊन येईल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही तुमच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधणे शुभ राहील.

कर्क

कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव जास्त असतो आणि चंद्रासाठी पांढरा रंग शुभ मानला जातो. त्यामुळे तुमच्या भावाची रास जर कर्क असेल तर त्याला पांढऱ्या रंगाची राखी बांधावी.

सिंह

सूर्य हा सिंह राशीत असल्यामुळे तुम्ही भावाला लाल आणि पिवळ्या रंग मिक्स असलेली राखी बांधू शकता.

कन्या

कन्या राशीच्या भावाला गडद हिरव्या रंगाची राखी बांधावी. यामुळे भावाची धन-दौलत वाढते. तसेच अडकलेली कामे मार्गी लागतात. कारण कन्या राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव जास्त असतो.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी गुलाबी रंग शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही या रंगाची राखी भावाला बांधू शकता. कारण शुक्र ग्रह तूळ राशीचा आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांवर मंगळाचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे तुम्ही भावाला मरून रंगाची राखी बांधावी. यामुळे भाऊरायावरील आर्थिक संकट दूर होईल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी पिवळा रंग शुभ मानला जातो. यामुळे तुमच्या भावाला पिवळ्या रंगाची राखी बांधा. त्याचे आरोग्य चांगले राहील.

मकर

तुमच्या भावाची मकर रास असल्यास त्यांना निळ्या रंगाची राखी बांधावी. कारण तो रंग त्यांच्यासाठी शुभ मानला जातो.

कुंभ

कुंभ रास असलेल्या मुलांना केशरी रंगाची राखी बांधणे शुभ राहील. कारण यामुळे भावाचे रक्षण होईल.

मीन

तुमच्या भावाची रास जर मीन असेल तर तुम्ही भावाला पिवळ्या रंगाची राखी बांधणे शुभ राहील. यामुळे भावाचे आरोग्य चांगले राहते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT