Raksha Bandhan 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2024 : यंदा रक्षाबंधन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, 'या' देवांना बांधा राखी, होतील मनोकामना पूर्ण

Raksha Bandhan Shubh Muhurat : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चला तर मग जाणून घेऊयात यंदा रक्षाबंधन कधी, शुभ मुहूर्त काय?

Shreya Maskar

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या शुभ दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्ट ला सर्वत्र साजरी केली जाणार आहे. सगळीकडे रक्षाबंधनचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त?

हिंदू पंचांगानुसार, १९ ऑगस्टला पहाटे ०३ वाजून ०४ मिनिटांपासून सुरू हेऊन रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरू होऊन रात्री ०९ वाजून ०८ मिनिटांपर्यंत राहील. तसेच त्या दिवशी संध्याकाळी ६.५७ ते रात्री ०९.१० या वेळेत राखी बांधणे अधिक शुभ राहील.

भद्रकाळ

यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ आहे. पंचांगानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे ५.५३ वाजता भद्रकाळ सुरू होऊन दुपारी १.३२ पर्यंत राहील. भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. कारण कथेनुसार, लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने भद्रकाळात राखी बांधली होती आणि त्याच वर्षी रामाने रावणाचा वध केला होता.

रक्षाबंधनला अनेक महिला भावासोबत देवाला ही राखी बांधतात जे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी देवाला राखी बांधल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, देवाला राखी बांधताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.

गणपती बाप्पा

हिंदू धर्मात कोणतीही पूजा श्रीगणेशाला वंदन केल्याशिवाय पूर्ण होत नाही. गणपतीला लाल रंगाची राखी बांधल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदते.

शंकर भगवान

रक्षाबंधन श्रावणात येत असल्यामुळे महादेवाच्या भक्तीत लोक तल्लीन होतात. त्यामुळे भगवान शंकराला राखी बांधणे शुभ राहते.

जय हनुमान

हनुमान हा भक्तांचे रक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असतो. त्यामुळे हनुमानाला लाल रंगाची राखी बांधणे शुभ राहील. तसेच कुंडलीतील मंगळाचा प्रभाव कमी होईल.

श्रीकृष्ण

श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाची राखी बांधणे शुभ राहते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT