Raksha Bandhan 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला भद्राचं सावट १० तासांचं; 30 की, 31 ऑगस्ट राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी?

Raksha Bandhan 2023 date in india : भावाला राखी बांधण्याचा योग्य दिवस कोणता? राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कधी?

कोमल दामुद्रे

Raksha Bandhan Date 2023 : श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. श्रावणातील दुसरा आणि महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. बहिण आणि भावाच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन. यंदा रक्षाबंधनला भद्राचं सावट आल्यामुळे ती साजरी करावी की नाही असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

यंदा भद्रामुळे रक्षाबंधनाचा सण हा दोन दिवस साजरा केला जाणार आहे. भावाला राखी बांधण्याचा योग्य दिवस कोणता? राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कधी हे जाणून घेऊया.

रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण श्रावण (Shravan) महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी श्रावणी पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:59 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7:50 वाजता समाप्त होईल. या पौर्णिमेच्या प्रारंभासह, भद्रा काल सुरू होणार आहे, जी 30 ऑगस्ट रोजी रात्री 9:02 वाजता समाप्त होईल. म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी 10 तास भद्राची सावली असेल, ज्यामध्ये राखी बांधली जाणार नाही.

1. 30 किंवा 31 कोणत्या दिवशी राखी बांधायची?

ज्योतिषशास्त्रानुसार बहिण आपल्या लाडक्या भावाला कोणत्याही दिवशी राखी बांधू शकतात परंतु, यासाठी भद्राचे सावट पाहून मगच राखी बांधा. जर तुम्ही 30 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणार असाल तर रात्री 9:20 वाजता भद्रा संपल्यानंतरच तुमच्या भावाला राखी बांधा. जर तुम्ही 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करणार असाल तर सकाळी 7.05 मिनिट आधी तुमच्या भावाच्या मनगटावर राखी बांधा.

2. राखी बांधण्यासाठी मुहूर्त

पंचांगानुसार, राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त 31 ऑगस्ट हा ब्रह्म मुहूर्त असेल. या दिवशी पहाटे ४.२६ ते ५.१४ पर्यंत ब्रह्म मुहूर्त आहे. ब्रह्म मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. या शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधल्याने ती व्यक्ती भाग्यवान ठरते.

3. भद्रा काळात राखी का बांधत नाही?

भद्राकाळात भावाच्या मनगटावर राखी (Rakhi) बांधणे चुकीचे समजले जाते. शूर्पणखाने भद्रा काळातच रावणाच्या मनगटावर राखी बांधली आणि त्याचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त झाले असे म्हटले जाते. त्यामुळे भद्राच्या काळात शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT