Raksha Bandhan 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2024 : यंदा रक्षाबंधन बनवा खास, भावाला गिफ्ट करा 'या' भन्नाट वस्तू

Raksha Bandhan Gift Ideas : जगातील सर्वात प्रेमळ नातं म्हणजे बहिणी-भावाचं. तर मग यंदाची रक्षाबंधन खास बनवण्यासाठी बहिणीने भावाला भन्नाट गिफ्ट्स द्या.

Shreya Maskar

'तुझं माझं जमेना, अन् तुझ्या वाचून करमेना...' बहीण भावाच्या अतूट नात्यांचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात विविध प्रकारचे रक्षाबंधन गिफ्ट्स आले आहेत. दरवर्षी भाऊ आपल्या बहिणीला रक्षाबंधन गिफ्ट देतो. मात्र यंदा बहिणींनी देखील भावाला गिफ्ट्स द्या आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन या. बहिणीने भावाला गिफ्ट करता येतील अशा झकास आयडिया जाणून घ्या.

शेविंग किट

तुम्ही तुमच्या भावाला रक्षाबंधनला एक शेविंग किट गिफ्ट करू शकता. तुमचा भाऊ तुमच्यावर खुश होईल. कारण त्याला उपयुक्त असलेली गोष्ट तुम्ही गिफ्ट करत आहात. हल्ली बाजारात विविध ग्रूमिंग किट मिळतात त्यातील एक किट तुम्ही तुमच्या भावाला द्या. रोज ऑफिसला जाताना तुमच्या भावाची शान वाढेल.

जिम सदस्यता

आजकाल मुलांच्या आयुष्यात जिम हा अविभाज्य भाग बनला आहे. आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी प्रत्येक मुलगा जिमला जातो. जर तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल तर तुम्ही त्याला जिम सदस्यता घेऊन देऊ शकता.

स्पोर्टस् शूज

मुलं मोठ्या प्रमाणात व्यायाम करतात. त्यामुळे त्यांना स्पोर्टस् शूजची नितांत गरज असते. तुम्ही देखील तुमच्या भावाला स्पोर्टस् शूज गिफ्ट केल्यास त्याला आनंद होईल. तसेच शूज रोजच्या वापरात येतील. तसेच तुमच्या भावाचा व्यायामही चांगला होईल. फक्त स्पोर्टस् शूज विकत घेताना ब्रँड आणि दर्जा लक्षात घ्यावा.

स्मार्ट वॉच

मुलांना स्मार्ट वॉच खूप आवडतात. तर तुम्ही तुमच्या भावाला एक छान स्मार्ट वॉच किंवा मोबाईल गिफ्ट करू शकता. मोबाईल पाहताच भाऊ तुमच्यावर खुश होईल. स्मार्ट वॉचमुळे तुमच्या भावाला व्यायामत देखील मदत होईल.

कपडे

तुमच्या लाडक्या भावाला या रक्षाबंधन ला छान पारंपारिक किंवा वेस्टर्न कपडे द्या. सहसा मुलं आपल्यासाठी खरेदी करत नाही. तर तुम्ही रक्षाबंधनला भावाला हे गिफ्ट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT