Ideal Daughter In Law  Saam TV
लाईफस्टाईल

Ideal Daughter In Law : आदर्श सुनेच्या अंगी असतात 'हे' गुण; वाचा आणि सासरच्या मंडळींचे मन जिंका

Ruchika Jadhav

एक मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा सासरची मंडळी मोठ्या आनंदाने तिचं स्वागत करतात. सुनेला आपल्या घरात कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेत असतात. मात्र मुलगी वेगळ्या घरात वेगळ्या माणसांमध्ये वाढलेली असते त्यामुळे तिचे विचार आणि त्यांचे विचार लगेचच पटत नाहीत. यावरून वादही होतात.

वाद झाल्यावर कोणत्याही सासरची माणसे आपली चूक असल्याचं मान्य करत नाहीत. खरंतर ते त्यांच्या जागी बरोबर असतात. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार सुनेलाच घरातील सर्व गोष्टींमध्ये अॅडजेस्टमेंट करावी लागते. आदर्श सुन होऊन आपल्या सासरच्यांचं मन जिंकावं लागतं. त्यामुळे आज आदर्श सुन व्हायचे असेल तर आपल्याकडे कोणते गुण असायला हवेत याबाबत जाणून घेऊ.

सकारात्मक विचार

लग्नानंतर प्रत्येक मुलीने आपली मानसिकता बदलली पाहिचजे. काही झाले तरी नकारात्मक विचार सोडून दिले पाहीजे. आपले विचार वेगळे असल्याने अनेक शुल्लक गोष्टींवरून सुनेचे मन दुखावले जाते. यासाठी महिला आपल्या पतीकडे तक्रार करतात. मात्र पती देखील नंतर समजावून थकून जातो. त्यामुळे आपल्याला काही अडचणी जाणवत असतील तर आधी त्यावर सकारात्मक विचार करून बघा. त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या.

रिती रिवाज

प्रत्येक कुटुंबात प्रत्येक जातीत आणि धर्मात विविध पद्धतीच्या रुढी परंपरा आणि रिती रिवाज असतात. आदर्थ सुन व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या सासूने वर्षानुवर्षे संभाळलेली जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घ्यावी लागेल. तुम्हाला सर्व रिती रिवाज फॉलो करावे लागतील. असे केल्याने तुम्ही तुमच्या सासूबाईंच्या मनात आदराचं स्थान मिळवण्यास यशस्वी व्हाल.

सामंजस्य भावना

आदर्श सुन व्हायचे असेल तर सासरच्या व्यक्तींबाबत आपल्या मनात सामंजस्याची भावना असायला हवी. घरातील सुनेकडे सर्वजण मोठ्या आदराने आणि भक्कम आधार म्हणून पाहत असतात. घरातील सासूबाई, सासरे, ननंद आणि जाव तसेच दिर यांच्याशी देखील सामंजस्य भूमिकेने वागावे. आपल्यासमोर कही कामे असतील किंवा काही निर्णय घ्यायचे असतील तर सामंजस्यतेने निर्णय घ्यावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT