Shreya Maskar
बाहेरून थकून आल्यावर पिण्यासलाठी चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवा.
चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी चिकू, खजूर , काजू , कोको पावडर, फ्रेश मलाई , बर्फ आणि दूध इत्यादी साहित्य लागते.
चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी चिकू स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात चिकूचे काप, खजूर, काजू, कोको पावडर, मलई आणि दूध टाका.
नंतर यात बर्फाचे तुकडे टाकून पेस्ट बनवून घ्या.
आता सर्व्हिंग ग्लासमध्ये चिकूचा चॉकलेट चिकू मिल्कशेक टाकून त्यावर कोको पावडर भुरभुरवा.
तुम्ही चॉकलेट चिकू मिल्कशेकवर काजू आणि बारीक चिरलेला चिकूचे तुकडे टाका.
तुम्ही यात चॉकलेट चिप देखील टाकू शकता.