Shreya Maskar
अळूचं फदफदं बनवण्यासाठी अळूची पाने, नारळाचे दूध, कांदा, लसूण, मिरची, चिंचेचा कोळ, तेल, मीठ आणि मसाले इत्यादी साहित्य लागते.
अळूचं फदफदं बनवण्यासाठी अळूची पाने स्वच्छ धुवून देठ काढून टाका.
एका बाऊलमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाका.
मोहरी तडतडल्यावर फोडणीत कांदा, लसूण आणि मिरच्या टाकून परतून घ्या.
चिरलेली अळूची पाने , हळद, चवीनुसार मीठ घालून भाजी शिजवा.
आता यात नारळाचे दूध घालून छान भाजी चांगली मिक्स करा.
त्यानंतर चिंचेचा कोळ घाला आणि एक उकळी काढून घ्या.
शेवटी कांदा, लसूण, मसाला घालून भाजी ५-१० मिनिटे शिजवा.