Propose Day Saam tv
लाईफस्टाईल

Propose Day : क्रशला प्रपोज करणार आहात? अजिबात 'या' चुका करू नका, अन्यथा...

Propose Day 2025 : आज तुम्ही प्रपोज डेचं औचित्य साधून क्रशला प्रपोज करणार असाल तर काही चुका अजिबात करू नका. प्रपोज करताना काही चुका केल्यास नुकसान होऊ शकते. तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो.

Vishal Gangurde

'व्हॅलेंटाइन डे'ची सुरुवात 'रोज डे'पासून होते. त्यानंतर ८ फेब्रवारी रोजी प्रपोज डे साजरा केला जातो. आज खरंतर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. अनेकांना क्रशला प्रपोज करताना भीती वाटत असते. मनातही अनेक प्रश्न निर्माण होतात. तुम्हाला क्रशला प्रपोज करायचा असेल, तर काही चुका अजिबात करू नका.

तुम्ही तुमच्या क्रशला प्रपोज करण्याआधी काही चुका टाळणे गरजेचे आहे. तु्म्ही चुका केल्यास क्रशच्या मनात चुकीची छाप निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रपोज करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

भुतकाळाविषयी बोलणे टाळणे

प्रपोज करताना क्रशसोबत भुतकाळात घडलेल्या गोष्टींचा उल्लेख करणे टाळले पाहिजे. तिच्या भुतकाळाविषयी बोलल्यास नकारात्मकता निर्माण होऊ शकते. आजचा दिवस फक्त क्रशसाठी राखीव ठेवावा. कोणत्याही जुन्या मुद्यावर चर्चा करु नये. तुम्ही एकमेकांसाठी किती महत्वाचे आहेत, याची जाणीव करून द्या.

क्रशच्या आवडीचा विचार करा

प्रपोज करताना चांगल्या ठिकाणाचा विचार करा. तुमच्या क्रशला ठिकाण आवडेल, अशा ठिकाणाची निवड करा. प्रपोज करण्याआधी क्रशला खाद्यपदार्थ किंवा गिफ्ट घेऊन जा.

क्रशला विचार करायला वेळ द्या

प्रपोज करताना क्रश तणावात येणार नाही, याची काळजी घ्या. तुम्ही प्रपोज केल्यानंतर क्रश उत्तर देताना कोणत्याही दबावात येणार नाही, याची काळजी घ्या. क्रश लगेच होकार देईल, यासाठी आग्रह करू नका. तुम्ही प्रपोज केल्यानंतर क्रशला विचार करण्यास पुरेसा वेळ द्या.

चुकीचे शब्द वापरू नका

तुम्ही प्रेम व्यक्त करताना भावना नियंत्रणात ठेवा. प्रेम व्यक्त करताना कधी कधी लोक भावुक होऊन जातात. भावनेच्या भरात काही चुकीचे शब्द बोलून गेल्यास पश्चाताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना विचारपूर्वक शब्दांची निवड केली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Maharashtra Live News Update: जळगावातील ग्रामीण भागात एलपीजी संकट, गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT