Lakshadweep Saam tv
लाईफस्टाईल

Lakshadweep : इटली, बालीपेक्षाही नयनरम्य आहे लक्षद्वीप! Honeymoon Destination साठी या ५ बेटांना नक्कीच भेट द्या

Honeymoon Destination Travel Plan : निसर्ग सौंदर्याने बहरलेले लक्षद्वीप एक सुंदर, रोमॅटिक हनिमून डेस्टिनेशन आहे. येथे अनेक पर्यटक भेट देतात.

कोमल दामुद्रे

Lakshadweep Travel Plan :

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीप दौऱ्यावर गेले होते. नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर करण्यात आले आहे. ज्यामध्ये ते लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर स्नॉर्कलिंग करताना आणि फिरताना दिसत आहे.

लक्षद्वीप हा भारतात गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा ९ वा शब्द आहे. निसर्ग सौंदर्याने बहरलेले लक्षद्वीप एक सुंदर, रोमॅटिक हनिमून डेस्टिनेशन आहे. येथे अनेक पर्यटक भेट देतात. जर तुम्ही देखील लक्षद्वीपला फिरायला (Travel) जात असाल तर या ५ बेटांना नक्की भेट द्या.

1. कावरत्ती बेट

तुम्हाला निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. समुद्रकिनाऱ्यावर पसरलेली पांढरीशुभ्र वाळू आणि सूर्यास्त या ठिकांणाची खासियत आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिली (Family) आणि जोडीदारासोबत जाऊ शकता.

2. आगत्ती बेट

खाद्यप्रेमींसाठी आगत्ती हे बेट बेस्ट ठिकाण (Place) आहे. या ठिकाणी तुम्हाला सी फूडपासून शाकाहारी जेवणापर्यंत अनेक पदार्थांची चव चाखता येईल. येथे अनेक रिसॉर्ट्स देखील आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही या ठिकांणी भेट देऊ शकता. स्नॉर्कलिंगसाठी हे ठिकाण सर्वोत्तम मानले जाते.

3. कल्पेनी बेट

काल्पेनी बेट हे तितके प्रसिद्ध नसले तरी तुम्हाला शांतता हवी असल्यास या पर्यटनस्थळाला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला स्कूबा डायव्हिंगचा आनंद लुटता येईल.

4. कदमत बेट

या बेटाजवळ तुम्हाला स्थानिक पदार्थांची चव चाखता येईल. येथे तुम्हाला ताजे सी फूड खाता येईल. हे ठिकाण काईट सर्फिंग, स्नॉर्कलिंग आणि समुद्रात डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे.

5. मिनिकॉय बेट

मिनिकॉय बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात प्रमुख आणि मुख्य भागांपैकी एक आहे. या बेटावर तुम्ही तुमच्या कुटुंबासह अनेक समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता आणि बोटिंगचा आनंदी घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood group: 'या' ब्लड ग्रुपला हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो जास्त

Maharashtra News Live Update: खरात हा श्रीमंत लोकांचा बाबा,गरीब श्रद्धा पाळतात अंधश्रद्धा नाही- मनोज जरांगे पाटील

Surya Gochar 2026: शुक्राच्या घरात सूर्य करणार प्रवेश; या ३ राशींच्या आयुष्यात येणार नव्याने आनंद

Madhuri Dixit: धक-धक गर्ल माधुरी दीक्षित इतक्या कोट्यवधींच्या मालकीण; रिअ‍ॅलिटी शोसाठी किती घेते मानधन?

Kedarnath Tourism : केदारनाथ परिसरात लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT