Pigon virus saam Tv
लाईफस्टाईल

Pigeon Virus: 'कबुतर' व्हायरस घेईल जीव; काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Pigon Denger For Human: आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची. आता कबुतर व्हायरसने दहशत माजवलीय असा मेसेज व्हायरल होतोय. हा व्हायरस आपल्या जीवावरही बेतू शकतो. मात्र, व्हायरस काय आहे? याची आम्ही पडताळणी केली. त्यानंतर काय सत्य समोर आलं चला पाहुयात.

Sandeep Chavan

कबुतर व्हायरस नाव ऐकूनच या व्हायरसचा धक्का बसला असेल. हा कबुतर व्हायरस आपल्या जीवावर बेतू शकतो असा दावा करण्यात आलाय. हा दावा गंभीर आहे. त्यामुळे कबुतर व्हायरस नक्की आहे तरी काय? कबुतर व्हायरसमुळे आपल्याला खऱंच धोका आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली,मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

कबुतरांची विष्ठा आणि पंखांच्या संपर्कात आल्याने दमा आणि टीबीसारखे गंभीर आजार होतात. फुफ्फुसाला संसर्ग होतो. हे आजार वाढले तर जीवावरही बेतू शकतं. हा दावा आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या हाती काही रिसर्च लागले.त्यामध्येही असे धक्कादायक दावे करण्यात आलेयत. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबतची अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

अनेक विकार कबुतराचे पंख आणि विष्ठेनं होतात.

कबुतरांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसाला संसर्ग होतो.

हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया, श्वसननलिकेला सूज येते.

दम लागणे, डोकेदुखी, खोकला लागतो.

हे गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेकजण कबुतर घरात पाळतात. कबुतरांना दाणे खायला घालणारेही कबुतरांच्या जास्त संपर्कात येतात. त्यामुळे कबुतरांपासून धोका टाळण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी तेदेखील पाहुयात.

काय काळजी घ्यावी?

कबुतराची घाण काढताना मास्क लावा

जास्त प्रमाणात कबुतर असलेल्या ठिकाणी जाणं टाळा

कबुतरांना हात लावल्यास हात स्वच्छ धुवा.

ही काळजी घेतली तर कबुतरांपासून होणारा धोका टळू शकतो.मात्र, आमच्या पडताळणीत कबुतरांमुळे आपल्या आरोग्यास धोका निर्माण होतो हा दावा सत्य ठरलाय. त्यामुळे तुम्ही कबुतर प्रेमी असाल तर थोडी काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT