Petrol Diesel Prices  Saam TV
लाईफस्टाईल

Petrol Diesel Price (23 September): कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वधारले; पेट्रोल-डिझेल महागणार? पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Rate in Mumbai Pune Today : महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Rate Today

पेट्रोल-डिझेलचे दर कच्चा तेलाच्या किमतीवर आधारभूत असतात. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात चढउतार होत आहे. परिणामी भारतातील इंधन कंपन्यांवर दरवाढीचा दबाव येत आहे. शुक्रवारी देखील कच्चा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. दरम्यान, कच्चा तेलाचे दर वाढताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले.

तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. मुंबई, पुणे नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. कच्चा तेलाच्या दराबाबत बोलायचे झाल्यास आज डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल आणि ब्रेंट क्रूड ऑइलच्या भावात बदल झाला.

क्रूड ऑइलमध्ये 0.45 टक्क्यांनी वाढ झाली असून भाव प्रति बॅरल 90.03 डॉलरने विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये 0.03 टक्क्यांनी घट झाली असून हे ऑइल प्रति बॅरल 93.27 डॉलरने विकले जात आहे. कच्चा तेलाच्या दरात अशीच वाढ होत गेली, तर राज्यात पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात भडका उडण्याची शक्यता आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचा भाव

दिल्ली

पेट्रोल- 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल- 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबई

पेट्रोल-106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल- 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल-92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल- 102.74 रुपये प्रति लिटर/ डिझेल-94.33 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

पुणे

पेट्रोल-106.20 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 92.71 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल-106.22 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल- 92.73 रुपये/ लिटर

ठाणे

पेट्रोल 106.45 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.92 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 93.44 रुपये/प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 107.02 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 93.51 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.14 रुपये प्रति लिटर/ तर डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव असे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी HPCL ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवावा. याशिवाय इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवा. BPCL च्या ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमत जाणून घेण्यासाठी, <डीलर कोड> 9223112222 वर पाठवता येईल. हे कोट पाठवल्यावर काही मिनिटांतच तुम्हाला कच्च्या तेलाच्या किंमती किती आहेत हे समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

Family Relations: घरी आलेल्या नातेवाईकांसमोर 'या' 4 चुका टाळा, घरचे वातावरण राहील आनंदी

HBD Dhanush : धनुषचा बॉलिवूडचा पहिलाच चित्रपट सुपरहिट, टॉप अभिनेत्रीसोबत रोमान्स

SCROLL FOR NEXT