Tooth pain without cavity SAAM TV
लाईफस्टाईल

Persistent toothache causes: सततची दातदुखी म्हणजे कॅविटी नाही; या गंभीर आजारांमध्येही होते दातांमध्ये तीव्र वेदना

Tooth pain without cavity: दात दुखू लागला की बहुतांश लोकांचा पहिला अंदाज असतो की, दातात किड झाली असावी. पण प्रत्येक वेळी दातदुखीमागे कीड किंवा साधी दंत समस्या असतेच असं नाही.

Surabhi Jayashree Jagdish

दातदुखीचा त्रास सुरु झाला की त्याचा परिणाम तुमच्या दररोजच्या कामावर होत असतो. ज्यावेळी दाढ दुखू लागते तेव्हा आपण तातडीने डेंटिस्टकडे धाव घेतो आणि बहुतेक प्रकरणांमध्ये ते पोकळी, संसर्ग किंवा हिरड्यांच्या समस्येमुळे होते. पण अनेकदा डॉक्टर सांगतात की, तुमचे दात पूर्णपणे ठीक आहेत तेव्हा दातदुखीचं नेमकं कारण काय असतं?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कधीकधी वेदना ही फक्त दातदुखी नसते. त्या नसा, सायनस किंवा जबड्याच्या समस्या देखील असू शकतात. यामधील फरक समजून घेतल्यास तुम्हाला उपचार करणं सोप होतं.

दातांचं दुखणं कसं असतं?

दातदुखी सहसा होते आणि निघूनही जाते. जर वेदना दातामुळे होत असतील तर गरम किंवा थंड काहीतरी खाताना किंवा चावताना आणखीन वाढते. यामध्ये हिरड्यांवर सूज आणि लालसरपणा देखील येऊ शकतो. दात किडल्यामुळे किंवा भेगांमुळे देखील दातदुखी होऊ शकते. डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर या वेदना दूर होतात.

या कारणांमुळे होऊ शकते दातदुखी

नसा

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया ही एक नसांची समस्या आहे. यामध्ये कधीकधी दातदुखी होऊ शकते. यात अचानक, तीव्र वेदना होऊ शकतात.

सायनस

वरच्या दातांची मुळं सायनस पोकळीच्या अगदी जवळ असतात. सायनसचं इन्फेक्शन किंवा क्रॉनिक सायनुसायटिसमुळे दातदुखी होऊ शकते

जबडा

TMJ म्हणजे Temporomandibular joint या समस्येत वेदना दातांपर्यंत पसरतात. हा सांधा तुमच्या जबड्याच्या खालच्या भागाला तुमच्या कवटीशी जोडतात. हा सांधा आपल्याला आपलं तोंड हलवण्यास मदत करतात. दात घासणं, जबडा हलवणं किंवा ताणणं यामुळे वेदना आणखी वाढू शकतात.

या कारणांमुळे होऊ शकतात दातात वेदना

  • कानाचा संसर्ग

  • डोकेदुखी

  • हृदयाशी संबंधित आजार

डॉक्टरांना कधी दाखवाल?

  • डॉक्टरने उपचार केल्यानंतरही वेदना कमी होत नाहीत.

  • हिरड्यांमध्ये जळजळ होणं

  • वेदना चेहऱ्याच्या इतर भागात पसरणं

  • अचानक वेदना सुरू होणे

  • वेदनेची तीव्रता वाढत जाणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग कधी होणार सुरु? किती झालं काम? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Live News Update : जळगावातील पहूरजवळील वाकोद शिवारात ५५ किलो गांजा जप्त

Gold Price: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, १० तोळा ९७०० रुपयांनी स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

Summer Health Tips : कडाक्याच्या उन्हातून घरी आल्यावर या चूका टाळाच, अन्यथा....

Wardha : आयकर अधिकारी असल्याचं सांगितलं, सर्च वॉरंट दाखवलं; वर्ध्यात प्राध्यपकाच्या घरात चोरट्यांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT