Pension Plan  Saam Tv
लाईफस्टाईल

Tax Free Pension Scheme: म्हातारपणाचं टेंशन नाही, या 4 योजनांमार्फत इन्कम टॅक्स होईल माफ, वाचा सविस्तर

Tips for Pension Plan: प्रत्येकाला आपलं म्हातारपण हे आर्थिक समस्यांवर मात करणार असाव, अशी इच्छा असते.

Shraddha Thik

Tax Free Pension Tips :

प्रत्येकाला आपलं म्हातारपण हे आर्थिक समस्यांवर मात करणार असाव, अशी इच्छा असते. यासाठी लोक आधीच त्यांच्या कमाईतून पैसे बाजूला काढून ठेवतात. म्हातारपणात आर्थिक संकट येऊ नये यासाठी पेन्शन खूप महत्त्वाची आहे.

परंतू ही बचत तुम्ही चांगल्या योजनांमध्ये गुंतवता तेव्हा त्याचा परतावा चांगला मिळतो आणि म्हातारपण आरामदायी जाते. अशाच काही योग्य योजना (Yojana) ज्या उत्कृष्ट परतावा तसेच कर लाभ देतात. चला पाहूयात.

पीपीएफ

पब्लिक प्रोविडेन्ट फंड (Fund) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ही सरकारी योजना दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. ज्यामध्ये धोकाही खूप कमी असतो. तसेच ही योजना 15 वर्षांत पूर्ण होते. गुंतवणूकदारांनी काढलेली रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.

युलिप योजना

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान तुम्हाला कर वाचवण्यासही मदत करू शकतात. हे गुंतवणूकदारांना डेट फंड आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. यामध्ये लाईफ कव्हरसोबतच गुंतवणुकीचा पर्यायही उपलब्ध आहे. गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मृत्यू लाभ दोन्ही करमुक्त आहेत.

गारंटीड सेविंग प्लान

ही एक नॉन-लिंक्ड एंडोमेंट योजना आहे. हा प्लान लाईफ कव्हर आणि मॅच्युरिटी लाभ दोन्हीची सुविधा प्रदान करते. मॅच्युरिटी दरम्यान मिळणारी रक्कम करमुक्त असते. मृत्यूच्या फायद्यांसाठी समान नियम आहेत.

गारंटीड इनकम लाइफ प्लान

ही एक विमा-बचत योजना आहे, जी आयुष्यभर उत्पन्नाची हमी देते. निवृत्तीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. योजनेअंतर्गत मिळणारे नियमित उत्पन्न करमुक्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black & White : 'खालिद का शिवाजी' चित्रपटावर सरकारनं बंदी का आणली? दिगदर्शकाचा मोठा खुलासा

PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

SCROLL FOR NEXT