'पोस्ट कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम'मध्ये व्हा सहभागी; अशा पद्धतीने करा नोंदणी Saam Tv
लाईफस्टाईल

'पोस्ट कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम'मध्ये व्हा सहभागी; अशा पद्धतीने करा नोंदणी

कोरोनावर मात केलेल्या अनेकांमध्ये लाँग कोविडची लक्षणं दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरोनावर मात केलेल्या अनेकांमध्ये लाँग कोविडची लक्षणं दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. म्हणूनच, या काळात संयम आणि धीराने प्रत्येक गोष्ट हाताळणं अत्यंत गरजेचं आहे. सोबतच या काळाता शारीरिक व मानसिक स्वास्थ मिळावं यासाठी ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी एकत्रितपणे 'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं आयोजन केलं आहे. जर या कार्यक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर प्रथम त्यासाठी नोंदणी करणं अत्यंत गरजेच आहे. म्हणूनच, या प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी कशा पद्धतीने करायची ते पाहुयात.

हे देखील पहा -

अशा पद्धतीने करा नोंदणी -

१. ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी आयोजित केलेल्या प्रोग्रॅमविषयी तुम्हाला दररोज सकाळ वृत्तपत्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून माहिती मिळतच आहे. याच माहितीमध्ये आता एक लिंक किंवा QR कोड देण्यात येत आहे. हा QR कोड तुम्हाला स्कॅन करावा लागणार आहे.

२. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर किंवा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं एक पेज ओपन होईल. (या पेजवर तुम्हाला कार्यक्रमाचं स्वरुप, रुपरेषा यांची सविस्तर माहिती मिळेल.)

३. तुमच्यासमोर 'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं पेज ओपन झाल्यावर सगळी माहिती नीट वाचून झाल्यावर पेजच्या सगळ्यात खाली टर्म्स अँड कंडिशन्स हा ऑप्शन असेल. त्यावर क्लिक करा आणि तेथील माहिती वाचा.

४. टर्म्स अँड कंडिशन्स (terms and conditions) वाचून झाल्यावर पेजच्या शेवटी 'रजिस्टर हिअर' Register Here या बटणावर क्लिक करा.

५. रजिस्टर हिअरवर (register here) क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल. तो फॉर्म नीट भरा. (या फॉर्ममध्ये तुमचा व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक लिहिणं अनिवार्य आहे.)

६. फॉर्म भरल्यावर सगळ्यात खाली Pay या बटणावर क्लिक करा. त्यात फी भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील. तुमच्या सोयीनुसार योग्य पर्याय निवडून पेमेंट करा.

७. पेमेंट झाल्यावर लिंक रिडायरेक्ट व्हायची वाट पाहा. ही लिंक योग ऊर्जाच्या पेजवर रिडायरेक्ट झाल्यावर तुम्हाला धन्यवादचा मेसेज येईल.

८. याच पेजवर तुम्हाला आणखी एक गुगल फॉर्मची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तुमची सगळी वैद्यकीय माहिती लिहा. तसंच कोविडसंबंधित काही समस्या असतील तर त्याही नमूद करा.

९. सगळी माहिती भरुन झाल्यावर फॉर्म सबमिट करा. (तुमची सगळी माहिती ही गोपनीय ठेवण्यात येईल.)

नोंदणीसाठी येथे क्लिक करा- https://www.yogaurja.com/post-covid-recovery-program.html

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठापणाला

SCROLL FOR NEXT