तुमच्या मुलाचे मौखिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी वेळोवेळी दातांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. जसं पालक त्यांच्या मुलाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्राधान्य देतात, तसंच तोंडाच्या स्वच्छतेवरही भर देणं आवश्यक आहे.
पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनमधील बालरोग दंतचिकित्सक डॉ. अभिनव तळेकर यांनी सांगितलं की, बाळाचे दात खाण्यासाठी, बोलण्यासाठी आणि चेहऱ्याच्या संरचनेच्या एकूण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. लहान वयात तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास दातांमध्ये पोकळी, हिरड्यांचा संसर्ग आणि अगदी बोलण्यातही अडचणी येऊ शकतात ज्याचा मुलांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. परिणाम, लवकर दात किडणं हे कायमस्वरूपी व्यत्यय आणू शकते व दीर्घकालीन दंत समस्या उद्भवू शकतात.
पालकांनी लहानपणापासूनच मुलांना योग्य ब्रशिंग, फ्लॉसिंग आणि निरोगी खाण्याच्या सवयी शिकवल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचे दात सुरक्षित राहतील व त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसेच दातांची समस्या कमी होईल, ज्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहिल. जेव्हा मुलांना आनंददायी आणि आकर्षक पद्धतीने दातांची काळजी घेण्यास प्रोत्साहित केले जाते, तेव्हा ते तोंडी स्वच्छतेचे मूल्य समजून घेतील आणि त्यांचं आरोग्य चांगले राखतील, असंही डॉ. तळेकर यांनी सांगितलं आहे.
पालकांनी तुमच्या बाळाचा पहिला दात येण्यापूर्वीच मौखिक काळजी घेण्यास सुरूवात करावी. दूध पाजल्यानंतर मऊ, ओल्या कापडाने त्यांच्या हिरडे हळूवारपणे पुसल्याने बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते आणि भविष्यात ब्रशिंगसाठी त्यांना तयार केले जाते. पहिला दात बाहेर पडल्यानंतर, लहान, मऊ ब्रिस्टल असलेला टूथब्रश वापरा आणि त्यांचे दात दिवसातून किमान दोनदा स्वच्छ केले जातील याची खात्री करा.
मुलाचे आवडते गाणे वाजवून, रंगीत टूथब्रश वापरून किंवा खेळ खेळत आनंदायी पध्दतीने त्यांना ब्रशिंगची सवय लावा. त्यांना त्यांचा टूथब्रश आणि टूथपेस्ट निवडू द्या जे त्यांच्यासाठी आनंद देणारे असू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांसोबत ब्रश देखील करावा जेणेकरून ते तुमचे अनुकरण करत दात घासण्याची सवय लावू शकतील.
मुलाने किमान २-३ मिनिटे दात घासावेत याची खात्री पालकांनी करावी. मुलांसाठी योग्य दात घासण्याच्या तंत्राबद्दल मार्गदर्शनासाठी दंत चिकीत्सकांचा सल्ला घ्या.
पालकांनी त्यांच्या मुलांना केक, पेस्ट्री, मिठाई, चॉकलेट, कँडी, ज्यूस आणि सोडा देणे टाळावे. यामुळे दात किडण्याचा आणि दातात पोकळी होण्याचा धोका वाढू शकतो. पालकांनो, लक्षात ठेवा की आज केलेले हे छोटे छोटे प्रयत्न भविष्यात तुमच्या मुलांचे हास्य टिकवून ठेवण्यात मदत करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.