Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांची एक चूक आणि मुलं होतात हट्ट, तुम्ही देखील असे करत नाही ना?

Parenting Mistake : हट्टी मुले अनेकदा कोणाचेही ऐकत नाहीत, त्यामुळे पालकांना कधी कधी रागवावे लागते.

कोमल दामुद्रे

Child Care Tips : मुलं ही देवा घरची फुलं. लहान मुलं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना आपण जसा आकार देऊ तसे ते घडतात. लहान असताना आपण सर्वच जण त्यांचा लाड करतो. त्यांचे योग्यप्रमाणे संगोपन करतो.

हट्टी मुले अनेकदा कोणाचेही ऐकत नाहीत, त्यामुळे पालकांना कधी कधी रागवावे लागते. असं म्हणतात की लहानपणी मुलांना जे काही शिकवलं जातं, ते त्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात. आपल्या मुलाने त्यांचे ऐकावे, समजूतदार व्हावे, असे सर्वच पालकांना वाटते, परंतु पालकांच्या अति लाडामुळे मूल हट्टी किंवा उद्धट होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पालकांच्या कोणत्या सवयींमुळे मुल हट्टी बनते.

1. मुलांवर जबरदस्ती करू नका

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांवर (Child) कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करता तेव्हा त्यांचा स्वभाव हट्टी होतो. मुलावर कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करू नका.

2. व्यत्यय आणू नका

कोणत्याही गोष्टीत वेळोवेळी अडथळे आले की मुलं हट्टी बनते. मुलाला त्याच्या वयानुसार (Age) समजावून सांगा. जर तुम्ही एखाद्या लहान मुलाला एखाद्या गोष्टीसाठी नको म्हटले तर तो तुमचे कधीच ऐकणार नाही.

3. मुलाला प्रेमाने समजावून सांगा

पालकांनी (Parenting) सर्वात मोठी चूक केली की जर मुलाने त्यांचे ऐकले नाही तर ते चिडतात आणि त्याला मारायला लागतात. मुलाच्या हट्टीपणाचे हे मुख्य कारण आहे. त्यामुळे मुलाला कधीही मारू नका, नेहमी प्रेमाने समजावून सांगा.

4. तुलना करू नका

प्रत्येक मूल वेगळे असते, काही मूल पटकन चालायला शिकते, तर दुसरे चटकन बोलायला शिकते. त्याचप्रमाणे, प्रत्येक मुलाची मानसिक क्षमता आणि शारीरिक क्षमता देखील भिन्न असते. त्यामुळे तुमच्या मुलाची इतर कोणत्याही मुलाशी तुलना करू नका.

5. मुलांना शिव्या देऊ नका

तुमच्या मुलाने तुमचा आणि तुमच्या निर्णयांचा आदर करावा असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांचाही आदर केला पाहिजे. मुलाला अजिबात शिव्या देऊ नका, त्यांना कधीही अपमानास्पद म्हणू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT