Parenting Tips , Manage your child's screen time Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांनो, मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय? कसे कळेल? या गोष्टी लक्षात ठेवा

Manage your child's screen time : अगदी सकाळी उठल्यापासून, खाताना आणि रात्री झोपेपर्यंत ते सतत फोनवर असतात. परंतु, मुले शांत बसतात यामुळे पालक याकडे सरार्स दुर्लक्ष करतात.

कोमल दामुद्रे

How To Control Child Screen Time :

हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पालक मुलांकडे व्यवस्थितरित्या लक्ष देत नाही. वाढत्या वयात मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ती, पालकांची. परंतु, कामाच्या गडबडीत पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. अशावेळी मुले हट्ट करु लागली किंवा रडू लागली की, आपण त्यांच्या हातात फोन देतो.

मुलांना यामुळे सतत फोन (Phone) पाहाण्याची सवय लागते. अगदी सकाळी उठल्यापासून, खाताना आणि रात्री झोपेपर्यंत ते सतत फोनवर असतात. परंतु, मुले शांत बसतात यामुळे पालक (Parents) याकडे सरार्स दुर्लक्ष करतात. मुलांना अतिप्रमाणात मोबाईलचे व्यसन कसे लागले आहे किंवा त्यांचा स्क्रीन टाइम वाढला आहे हे कसे कळेल जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. मुलांमध्ये स्क्रीन टाइम वाढण्याची लक्षणे

  • मुलांना (Child) मोबाइल पाहायला मिळाला नाही की, ते खेळणी आणि इतर वस्तू फेकून देतात.

  • खेळताना सतत चिडचिड करणे, बाहेरचे वातावरण आवडेनासे होणे.

  • शरीराचे भान न राहाणे, सतत रडणे.

  • कोणत्याही कामावर किंवा खेळावर लक्ष केंद्रित करु शकत नाही.

  • मोठ्यांशी बोलताना सतत चिडचिड करणे, त्यांच्यावर आरोडणे, त्यांचा सतत रागराग करणे यांसारख्या गोष्टी मुले करु लागतात.

2. मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी कराल?

  • मुलांना शक्य तितक्या शारीरिक हालचाली करायला लावा.

  • त्यांना घराबाहेर मोकळ्या वातावरणात खेळायला पाठवा.

  • झोपेतून उठण्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम टाळा.

  • शाळेतून घरी आल्यानंतर स्क्रीन टाइमला परवानगी देऊ नका. यावेळी त्यांच्याशी बोला, त्यांच्या शाळेविषयी सर्व माहिती मिळवा. त्यांना व्यस्त ठेवा ज्यामुळे स्क्रीन टाइमपासून त्यांना लांब ठेवता येईल.

  • तसेच मुलांची स्क्रिन टाइम वाढवण्यासाठी मर्यादा सेट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT