Parenting Tips Saam tv
लाईफस्टाईल

Parenting Tips: लहानपणीच रुजवा मुलांमध्ये सामाजिक शिष्टाचार; पालकांचे हेच प्रथम कर्तव्य

Parenting Tips For Child: पालक नेहमी आपल्या मुलाच्या उज्जवल भविष्याचा विचार करत असतात. आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठे व्हावे असं प्रत्येक पालकाचे स्वप्न असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजची लहान मुले उद्याचा समाज आहेत हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे लहान वयातच मुलांना चांगल्या वाईटाची समज करून देणे हे त्यांच्या पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. लहान मुल नेहमीच आपल्या पालकांचे अनुकरण करत असतात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसमोर चांगली वर्तणूक ठेवणे महत्त्वाचे आहे.

लहानपणापासूनच पालकांनी मुलांवर योग्य संस्कार करणे गरजेचे आहे. मुले शाळेत आणि समाजात कशी वागतात, यावरून पालकांचे संगोपन बऱ्याच अंशी दिसून येते. पालकांनी मुलांचे अतिलाड करणे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी धोक्याचे आहे. लहान वयातच तुमच्या मुलांना या सामाजिक शिष्टाचाराच्या चांगल्या गोष्टी शिकवा, यामुळे पुढे जाऊन तुमचेच नाव मोठे होईल.

दुसऱ्यांची मदत करणे

आपल्याला शक्य असल्यास दुसऱ्यांची मदत करावी हा गुण लहानपणीच आपल्या मुलांना लावा. तुमच्या मुलांना लहानपणापासूनच सक्षम बनवा जेणेकरून ते आपल्या सोबतच इतरांचीही काळजी घेऊ शकतील. यामुळे त्यांच्यात मदतीची भावना आणि दुसऱ्यासाठी आपुलकी तयार होईल. तसेच गटामध्ये काम करण्याचे कौशल्य(Skill) देखील ते अवगत करतील.

मिळून मिसळून राहणे

लहान वयातच मुलांना मिळून मिसळून राहायला शिकवा. आपली गोष्टी चांगल्या मनाने गरज पडल्यास इतरांना देणे किती महत्त्वाचे आहे याची त्यांना जाणीव लहानपणापासूनच करून द्यावी, असे केल्यास मुलांमधील भेदभावाची भावना दूर होते आणि मुले आनंदाने एकत्र वेळ घालवतात.

लोकांना प्रोत्साहन देणे

मुलांच्या मनात पालकांनीच प्रोत्साहनाची भावना निर्माण केली पाहिजे. मुलांच्या छोट्या यशावर त्यांचे भरपूर कौतुक करून पुढच्या कामासाठी त्यांना प्रोत्साहन करा तर अपयश आल्यावर तुम्ही यातून बाहेर पडू शकता हा विश्वास द्या, यामुळे मुलांना प्रत्येक गोष्टीची किंमत कळते आणि असेच प्रोत्साहन ते बाहेरही इतर लोकांना देऊ शकतील.

मोठ्याचा आदर करायला शिकवा

आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक(palak) मुलांना पुरेसा वेळ देत नाही त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. लहानपणापासूनच मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करा, यामुळेच ते मोठ्याचा आदर करतील आणि लहानांना छान समजून घेतील.

स्वावलंबी बनवा

मुलांना लहान वयातच तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः करायची सवय लावा, त्यामुळे ते स्वावलंबी बनतील. त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान होईल. स्वतंत्रतेचे महत्त्व त्यांना कमी वयातच कळू लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

इराणवर अणुहल्ला होणार का? ट्रम्प यांच्या धमकीनंतर मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT