Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : तुमचीही मुलं वर्गात टॉप करतील? बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी या ५ गोष्टी करा

Study Tips : पालक मुलाला चांगले वळण लावतात तसेच त्यांच्या दिवसभरात आहाराची काळजी घेतात. या सर्व गोष्टी मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत करतात.

कोमल दामुद्रे

5 Ways to Help Your Child Succeed in School :

लवकरच मुलांच्या वार्षिक परीक्षा सुरु होतील. अशावेळी प्रत्येक पालकांना वाटते की, आपल्या मुलाला शाळेत पहिला क्रमांक मिळावा. त्याने अभ्यासात शाळेत चांगली कामगिरी करावी अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते.

पालक मुलांना (Child) चांगले वळण लावतात तसेच त्यांच्या दिवसभरात आहाराची काळजी घेतात. या सर्व गोष्टी मुलांना परीक्षेत (Exam) चांगले गुण मिळवण्यास मदत करतात. परंतु, यामध्ये अशा इतर अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला अभ्यासात प्रावीण्य मिळू शकते. मुलांनी अभ्यास हुशार व्हावे आणि वर्गात टॉप यायला हवे असे तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टी पालकांनी (Parents) आजपासूनच करा.

1. वाचायला शिकवा

तुमच्या मुलांना वाचनाची गोडी लावा. त्यामुळे त्यांना वाचनाची आवड लागेल. तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडेल. या चांगल्या सवयीमुळे अभ्यासात हुशार होतील.

2. वेळोवेळी चांगल्या गोष्टी शिकवा

मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवत असाल तर इतकेच पुरेसे नाही. त्यांना घरातही काही गोष्टी शिकवू शकता. मुलांशी संवाद साधा. त्यांना सतत प्रश्न विचारा. त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडेल अशा गोष्टी करा.

3. माहिती घ्या

मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांनी अधिक जागरुक असायला हवे. त्यासाठी पालकांनी त्यांची पुस्तके, गृहपाठ पाहा, त्यांना प्रकल्पात वेळोवेळी मदत करा. मुलांना शाळेत काय शिकवले गेले आहे हे देखील विचारा.

4. इतर गोष्टी

मुलांना फक्त शाळेतला अभ्यास शिकवू नका तर त्यांना इतर गोष्टी देखील शिकवा. जसे की, त्यांन स्पर्धेत भाग घ्यायला सांगा. ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल जो अभ्यासतही उपयोगी पडेल.

5. बुद्धिमत्ता ओळखा

अभ्यासाच्या बाबतीत मुलांची बुद्धिमत्ता काय आहे ते ओळखा. त्यानुसार पालकांनी मुलांवर अधिक मेहनत घ्यायला हवी. पाल्याला योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शनही करु शकता. अभ्यासाचे वेळापत्रक ठरवून द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT