heart attack pain saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या १ आठवड्यापूर्वी शरीराच्या 'या' भागात जाणवतात वेदना; 90% लोकं करतात दुर्लक्ष

Warning Signs of a Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुम्हाला शरीर काही संकेचत देतं. या संकेतांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. हार्ट अटॅक येण्याच्या एक आठवड्यापूर्वी शरीरातील 'या' भागांमध्ये वेदना जाणवू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या केवळ प्रौढ व्यक्ती नव्हे तर तरूणाईमध्ये देखील हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे ही समस्या वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुम्हाला शरीर काही संकेचत देतं. या संकेतांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.

बहुतेक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराचा झटका येण्याच्या सुमारे 1 महिना ते 2 दिवस आधी आपले शरीर अनेक संकेत देतं. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीराच्या काही भागात होणाऱ्या वेदनांबद्दल सांगणार आहोत. अशावेळी हार्ट अटॅक येण्याच्या एक आठवड्यापूर्वी शरीरातील 'या' भागांमध्ये वेदना जाणवू शकतात.

छातीत वेदना होणं

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी रुग्णांना छातीत तीव्र वेदना जाणवू शकतात. शिवाय यावेळी तुमच्या हृदयावर भारीपणा जाणवण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणारी वेदना सामान्यतः डाव्या हाताला प्रभावित करते.

पाठीत वारंवार वेदना होणं

हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी तुमच्या पाठीमध्येही वेदना जाणवण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय पाठदुखी होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. जर हा त्रास वारंवार जाणवत असेल तर वेळी डॉक्टरांची मदत घ्या.

जबड्यामध्ये वेदना होणं

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी रुग्णांना जबड्यात वेदना जाणवू शकतात. जबड्यातील वेदनांकडे व्यक्ती सहसा लक्ष देत नाही. ज्यावेळी ही परिस्थिती गंभीर बनते त्यावेळी उशीर झालेला असतो. त्यामुळे जबड्यातील वेदनांकडे दुर्लक्ष करू नका.

हातांमध्ये वेदना होणं

हृदयविकाराचा झटका येण्याच्या जवळपास एक आठवडा अगोदर रुग्णांना खांदा आणि हातामध्ये खूप वेदना होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये खूप दुखत असेल आणि ही वेदना वारंवार होत असेल तर अशा परिस्थितीत एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या गाडीवर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT