New Electric Scooter Launch Saam Tv
लाईफस्टाईल

New Electric Scooter Launch : OLA चा ग्राहकांसाठी धमाका! 2 इलेक्ट्रिक स्कुटर लाँच, लगेच खरेदी केली तर मिळेल भरघोस डिस्काउंट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

OLA New Electric Scooter Launch:

Ola इलेक्ट्रिक, देशातील अग्रगण्य ऑटो उत्पादन कंपनीने अलीकडेच आणखी 2 इलेक्ट्रिक स्कूटर आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडल्या आहेत. 15 ऑगस्टच्या निमित्ताने कंपनीने आणखी 2 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. एक OLA S1X आणि दुसरा OLA S1X+ आहे. दोन्ही स्कूटरची किंमत एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

आतापर्यंत कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये OLA S1 Air ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर होती पण आता पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर OLA S1X आहे. कंपनीने ही स्कूटर 2 बॅटरी व्हेरियंटसह लॉन्च केली आहे. जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यातच बुक करा, कारण त्यानंतर तुम्हाला ही स्कूटर 10 हजार रुपयांनी महाग मिळेल. या ऑफरची (Offer) माहिती आपण पाहूयात.

नवीन स्कूटर S1X लाँच

कंपनीने नवीन स्कूटर S1X S1X आणि S1X+ या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. ही स्कूटर सर्व नवीन मल्टी टोन डिझाइनसह उपलब्ध असेल. त्याची रेंज 151 किमी असेल. यात 2 kwh आणि 3 kwh बॅटरी पॅकचा पर्याय मिळेल. ही स्कूटर 3.3 सेकंदात 0-40 किमी/ताशी वेग पकडण्यास कॅपेबल आहे. आणि त्याची बूट स्पेस 34 लीटर आहे. कंपनीच्या लाइन-अपमध्ये आता 5 इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, ज्यात S1 Pro, S1 Air, S1X+, S1X, S1X (2kwh) यांचा समावेश आहे.

21 ऑगस्टपूर्वी बुक करा

कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी 15 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमाद्वारे त्यांची नवीन स्कूटर (Scooter) लॉन्च केली. कार्यक्रमादरम्यान, या स्कूटर्सच्या किमती उघड झाल्या आणि कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्सचीही माहिती मिळाली. ही ऑफर 21 ऑगस्टपर्यंत वैध करण्यात आली आहे आणि त्यानंतर या स्कूटरच्या किंमती वाढतील अशी घोषणा त्यांनी केली.

किंमत किती आहे?

दुसऱ्या versionच्या Ola S1 Pro ची किंमत 1,47,499 रुपये, S1 Air ची किंमत 1,19,999 रुपये, S1X+ ची किंमत 1, 09,999 रुपये, S1X (2kwh) ची किंमत 89,999 रुपये, S1X (3kwh) ची किंमत 99,999 रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

OLA S1X श्रेणी आणि उच्च गती

Ola इलेक्ट्रिक वेबसाइटनुसार, OLA S1 X 2kW बॅटरी व्हेरियंटसह लॉन्च (Launch) करण्यात आल्या आहेत. ही स्कूटर 2kW आणि 3kW व्हेरियंटसह लॉन्च करण्यात आली आहे. 2kW प्रकारासाठी याची प्रमाणित श्रेणी 91 किलोमीटर आणि ताशी 90 किलोमीटर इतकी आहे.

याशिवाय, 3kW इलेक्ट्रिक स्कूटरची प्रमाणित श्रेणी 151 किलोमीटर आहे आणि टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास आहे. तथापि, OLA S1X+ मध्ये, कंपनी ग्राहकांना 151 किलोमीटरची प्रमाणित श्रेणी आणि 90kmph चा टॉप स्पीड देत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT