ola Electric scooter Saam Tv
लाईफस्टाईल

OLA ची बंपर ऑफर; झीरो डाऊन पेमेंटमध्ये घरी आणा इलेक्ट्रिक स्कूटर, एक वर्षासाठी चार्जिंग मोफत

नव्या वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांसाठी ओलाने मोठी ऑफर जाहीर केली आहे.

Vishal Gangurde

Ola Electric Scooter News : नव्या वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांसाठी ओलाने मोठी ऑफर जाहीर केली आहे. ओला इलेक्ट्रिकच्या 'डिसेंबर टू रिमेंबर' या स्कीम अंतर्गत डिसेंबर महिन्यात ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ओला एस १ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरवर १० हजार रुपयांची फ्लॅट सूट दिली जात आहे. (Latest Marathi News)

ओला एस १ प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरुममधील किंमत १.३० लाख आहे. कंपनी झीरो डाऊन पेमेंट आणि कमी मासिक ईआयएमची (EMI) सुविधा देत आहे. स्कूटर घेतल्यास केवळ २,४९९ रुपये मासिक ईआयएम द्यावा लागेल. तर व्याजदर ८.९९% लागू करण्यात आला आहे.

ओला इलेक्ट्रिकचे प्रमुख मार्केटिंग ऑफिसर अंशुल खंडेवाल यांनी सांगितले की, 'ग्राहक आता झीरो डाऊन पेमेंटवर ओला स्कूटर घेऊ शकतो. ग्राहकाला स्कूटर तात्काळ सोपावण्यात येईल. स्कूटर घेतल्यानंतर एक वर्ष मोफत चार्जिंग उपलब्ध असणार आहे. तसेच एक वर्ष मोफत सर्व्हिस देखील उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त अनेक फायदे ग्राहक घेऊ शकतात'.

एक वर्ष मोफत चार्जिंग

ओला इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्या ग्राहकांना झीरो प्रोसेसिंग शुल्काचा लाभ घेता येणार आहे. तसेत मोजक्या क्रेडिट कार्डवर अधिक सूट आहे. तसेच हायपरचार्जर नेटवर्कवर एक वर्ष मोफत चार्जिंगचा लाभ घेता येणार आहे.

१० स्कूटर मोफत

ग्राहकांना रेफरल प्रोग्राम रिवार्ड्सचा देखील लाभ घेता येणार आहे. रेफरल स्पर्धेतील विजेत्यांना १० मोफत एस १ प्रो स्कूटर देण्याची योजना आहे.

ओला स्कूटरची किंमत?

ओला इलेक्ट्रिक प्रीमियम ईवी स्पेसमध्ये टॉप आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांनी या वर्षी नोव्हेंबर महिन्यात २०,००० हून अधिक वाहने विकली आहेत. या क्षेत्रात ५० टक्के कब्जा केला आहे. इलेक्ट्रिक स्कूटर भारतात तयार झाली आहे. एस १ AIR ची किंमत ८४,९९९ रुपये आहे. एस १ ची किंमत ९९,९९९ रुपये आहे. तर एस १ प्रो स्कूटरची किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT