Ganesh Utsav 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Utsav 2022 : गणेश चतुर्थीनिमित्त बनवा पोह्यांचे चविष्ट लाडू ! जाणून घ्या त्याची रेसिपी

गणपतीला द्या पोहाच्या लाडवांचा नैवेद्य

कोमल दामुद्रे

Ganesh Utsav 2022 : गणपती सण हा महाराष्ट्रातला लोकप्रिय सण आहे. या दिवसात आपण नवनवीन पदार्थ बनवतो. गणपतीला (Ganpati) सगळ्यात प्रिय असणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य देखील आपण ठेवतो.

पोहे ही अशी गोष्ट आहे की, आपण नाश्त्याच्या विविध पाककृती आणि स्नॅक्स यापासून बनवू शकतो. पोह्यांसह आपण इंदोरी पोहे, पोहा कटलेट इत्यादी अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकतो. गणेश चतुर्थी हा सण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

यावर्षी गणेश चतुर्थी हा सण ३१ ऑगस्ट २०२२ रोजी साजरा केला जाईल. अशा परिस्थितीत, या खास प्रसंगी, जर तुम्हाला काही खास लाडूंनी बाप्पाचे स्वागत करायचे असेल, तर आम्ही तुम्हाला खास पोह्यांच्या लाडू बद्दल सांगणार आहोत.

पोह्यांपासून खूप चवदार लाडू बनवता येतात. पोहा लाडू एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय डिश आहे. तिथल्या घरांमध्ये, विशेषतः सणांच्या निमित्ताने तो बनवला जातो. खास प्रसाद देऊन बाप्पाला प्रसन्न करायचे असेल, तर पोह्याच्या लाडूची सोपी रेसिपी जाणून घ्या. यासोबत ते कसे बनवायचे हे देखील पहा

साहित्य-

पोहे - २ कप

खोबऱ्याचा किस - १ कप

काजू आणि पिस्ता - १ कप (बारीक चिरून)

खोबऱ्याचे तुकडा - १/२ कप

वेलची पावडर - अर्धा टीस्पून

गूळ - अर्धी वाटी

तूप - अर्धी वाटी

दूध (Milk) - अर्धा कप

कृती-

१. पोह्याचे लाडू बनवण्यासाठी पोहे भाजून घ्या.

२. यानंतर खोबरे २ ते ३ मिनिटे भाजून घ्या.

३. यानंतर पोहे, खोबरे, वेलची पूड आणि गूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

४. यानंतर ते एका भांड्यात काढा आणि थोडे कोमट दूध मिसळा.

५. यानंतर त्यात ड्रायफ्रुट्स टाकून हाताला तूप लावा.

६. यानंतर लाडूच्या आकारात तयार करून ठेवा.

७. तुमचे चविष्ट पोह्याचे लाडू तयार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT