Health risks caused by obesity in india saam tv
लाईफस्टाईल

Obesity in india: लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करू नका; वाढतं वजन ठरू शकतं अनेक आजारांचं कारण

Health risks caused by obesity in india: भारतामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वेगाने वाढत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार आणि फॅटी लिव्हरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

भारतामध्ये सर्व वयोगटांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वेगाने वाढतंय. लठ्ठपणा हा फक्त दिसण्याशी किंवा शरीराच्या आकाराशी संबंधित प्रश्न नाही. लठ्ठपणामुळे हार्ट अटॅक, मधुमेह, फॅटी लिव्हर, उच्च रक्तदाब आणि किडनीच्या समस्यांचा धोका वाढतो. या आजारांमुळे व्यक्तीच्या एकूण आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त निरोगी राहण्यासाठी आणि योग्य वजन राखण्यासाठी काय करू शकतो ते पाहूयात.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयाच्या बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितलं की, भारतात लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. लठ्ठपणा हा फक्त शरीराचं वजन वाढणं किंवा दिसण्याशी संबंधित समस्या नसून ती एक गंभीर आरोग्याची समस्या आहे. लठ्ठपणाचा परिणाम शरीरातील अनेक अवयवांवर होतो. आजकाल लोकांची जीवनशैली अधिक बसून राहण्याची झालीये. व्यायाम कमी झाला असून ताणतणाव वाढला आहे आणि जंक फूडचं सेवन जास्त झालंय. या सर्व कारणांमुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढतंय.

लठ्ठपणामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या

मधुमेह

लठ्ठपणा म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात चरबी साठणं. यामुळे शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. जर मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही, तर त्याचा परिणाम हृदय, नस, डोळे आणि किडनीवर होऊ शकतो.

उच्च रक्तदाब

शरीराचं वजन जास्त असल्यास हृदयाला शरीरात रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो आणि उच्च रक्तदाब होतो. जर उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही, तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये.

किडनीचं नुकसान

जास्त वजनामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते. या दोन्ही समस्या पुढे जाऊन दीर्घकालीन किडनी विकारांना कारणीभूत ठरू शकतात. जास्त वजनामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे शरीरातील घातक पदार्थ फिल्टर करण्याची त्यांची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे किडनीचं आरोग्य जपणं खूप महत्त्वाचं आहे.

फॅटी लिव्हर

लठ्ठपणा असलेल्या अनेक लोकांच्या यकृतात जास्त प्रमाणात चरबी साठते. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होऊ शकतो. सुरुवातीला याची कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. पण कालांतराने यामुळे लिव्हरला सूज येऊ शकते. जखमा तयार होऊ शकतात आणि गंभीर परिस्थितीत लिव्हर फेल्युअर देखील होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT