Obesity health risks SAAM TV
लाईफस्टाईल

Obesity health risks: सडपातळ दिसणाऱ्यांमध्येही लठ्ठपणाचा धोका; शरीराला आतून पोहोचतोय धोका; या तपासण्या नियमित करा

Health Tests You Should Never Ignore: जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे शरीरात अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. HbA1c, लिपिड प्रोफाइल, लिव्हर आणि थायरॉईड तपासणी का महत्त्वाची आहे

Surabhi Jayashree Jagdish

जास्त वजन किंवा स्थूलता ही केवळ बाह्य स्वरूपाची समस्या नसून ती अनेक गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. अतिरिक्त वजनामुळे मधुमेह, हृदयविकार, फॅटी लिव्हर तसंच हार्मोन्सचं असंतुलन यांचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासण्या करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

वेळोवेळी हेल्थ चेक-अप केल्यास अनेक आजार सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतात आणि पुढील गंभीर गुंतागुंत टाळता येते. त्यामुळे ज्यांचं वजन जास्त आहे किंवा जे स्थूलतेच्या श्रेणीत येतात त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आरोग्याची काळजी घेणं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. खालील महत्त्वाच्या तपासण्या आणि काही सोप्या उपायांच्या मदतीने स्थूलतेवर वेळीच नियंत्रण मिळवणं शक्य होतं.

सध्या भारतात लठ्ठणपणाची समस्या वेगाने वाढताना दिसतेय. अनेक वेळा जास्त वजन असलेल्या व्यक्तींना स्वतःला पूर्णपणे निरोगी असल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे ते आरोग्य तपासण्यांकडे दुर्लक्ष करतात. मात्र शरीरात साचणारी अतिरिक्त चरबी हृदय, यकृत (लिव्हर) आणि स्वादुपिंड (पॅनक्रियास) यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करू शकते.

विशेष म्हणजे मधुमेह, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, थायरॉईडचं असंतुलन किंवा काही व्हिटॅमिन्सची कमतरता यांसारख्या समस्या सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणं न दाखवता हळूहळू विकसित होऊ शकतात. याच कारणामुळे जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागृत राहणं आवश्यक आहे. नियमित रक्त तपासण्या केल्याने लठ्ठपणामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या लपलेल्या समस्या वेळेवर ओळखता येतात आणि त्यावर योग्य उपचार सुरू करता येतात.

महत्त्वाच्या तपासण्या ज्या दुर्लक्षित करू नयेत

HbA1c (रक्तातील साखरेची तपासणी)

ही तपासणी गेल्या तीन महिन्यांतील रक्तातील साखरेचं सरासरी प्रमाण दर्शवते. जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स आणि टाइप २ मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. HbA1c चं प्रमाण वाढलेलं असल्यास लक्षणं दिसण्यापूर्वीच प्रीडायबेटीस किंवा मधुमेहाची शक्यता लक्षात येऊ शकते. त्यामुळे ही तपासणी दर सहा महिन्यांनी करून घेणं उपयुक्त ठरते.

लिपिड प्रोफाइल

या ब्लड टेस्टमध्ये तपासणीत LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल, HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल तसंच ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण तपासलं जातं. स्थूलतेमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

लिव्हर फंक्शन टेस्ट

अतिरिक्त वजनामुळे फॅटी लिव्हर होण्याचा धोका वाढतो. LFT तपासणीद्वारे लिव्हरचं आरोग्य तपासता येतं आणि लिव्हरमध्ये चरबी साचल्यामुळे होणारे सुरुवातीचे बदल किंवा नुकसान लवकर ओळखता येतात.

थायरॉईड फंक्शन टेस्ट

थायरॉईड हार्मोन्स शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रित करण्याचं काम करतात. जर थायरॉईड ग्रंथीचं कार्य कमी झालं तर वजन वाढणं, सतत थकवा जाणवणं आणि मेटाबॉलिझम मंदावणं अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे थायरॉईडची तपासणी वेळोवेळी करून घेणं आवश्यक आहे.

व्हिटॅमिन डी पातळी

जास्त वजन असलेल्या अनेक व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. या कमतरतेमुळे सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात तसंच मानसिक ताणही वाढू शकतो. लठ्ठपणाकडे कधीही दुर्लक्ष करू नका आणि योग्य वेळी आवश्यक पावलं उचला. नियमित तपासण्यांसोबतच ताज्या फळे आणि भाज्यांनी भरपूर असलेला पौष्टिक आहार घ्या. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या, पुरेशी झोप घ्या आणि दररोज नियमित व्यायाम करण्याची सवय लावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vladimir Putin : अमेरिकाविरोधात रशियाचा इराणला जाहीर पाठिंबा, व्लादिमीर पुतीन म्हणाले...

Bollywood Celebrity: अमिताभ बच्चन ते सलमान खान; प्रॉपर्टी भाड्याने देऊन लाखो कमावतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी

Force 3 : अ‍ॅक्शनचा डबल डोस घेऊन येतोय 'फोर्स 3' ; जॉन अब्राहमसोबत झळकणार 'हा' सुपरस्टार, शूटिंग सेटवरील VIDEO समोर

Maharashtra Politics : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हाअध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण आले समोर

Maharashtra Live News Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT