Alum uses, Benefits of alum ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Home Remedies : रुपयात मिळणाऱ्या तुरटीचे आरोग्यासाठी असंख्य फायदे

आयुर्वेदात महत्त्व असणाऱ्या तुरटीचे फायदे जाणून घ्या

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या घरात तुरटी ही साधारणपणे आढळते. दाढी केल्यानंतर आपल्या घरातील पुरुष मंडळी तिचा वापर चेहऱ्याला लावण्यास करतात.

हे देखील पहा -

तुरटीला आयुर्वेदातही महत्त्व आहे. पाणी शुध्द करण्यापासून ते आपल्याला शरीरातील जखम भरण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो. तुरटीत अनेक अँटिसेप्टिक गुण आहेत. तुरटीला ऍलमला, पोटॅशियम ऍलम, पोटॅश ऍलम वा पोटॅशियम एल्युमिनियम सल्फेटही म्हटले जाते. दिसायला पांढरी शुभ्र अगदी साखरेसारखी असते पण थोडी रखरखीतही असते. चवीला नावाप्रमाणेच तुरट असते. त्वचेच्या अनेक आरोग्यासाठी तुरटाचा फायदा कसा होतो हे जाणून घेऊया.

तुरटीचे फायदे -

१. शरीरातील रक्ताभिसरणाची पातळी व्यवस्थितरित्या करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा काही भाग व सैंधव मीठ टाकून अंघोळ केल्यास फायदा होतो.

२. शरीराला जखम झाल्यास किंवा त्या जागेतून रक्त न थांबल्यास त्या जागेवर तुरटी लावल्यास रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते.

३. चेहऱ्यावर (Skin) मुरुमे किंवा डाग येत असतील तर त्यावर तुरटी चोळावी. यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते.

४. बहुतेक महिलांच्या (Womens) टाचांना भेगा पडतात अशावेळी तुरटी गरम करुन त्याचे तयार होणारा फेस त्या जागी लावल्यास आराम मिळेल. असे नियमित केल्यास टाचा भरून निघण्यास मदत होईल.

५. तोंडाची दुर्गंधी येत असल्यास किंवा त्यातील जिवाणूंचा नाश करण्यासाठी तुरटीला गरम पाण्यात पाच मिनिटे सोडा. नंतर या कोमट पाण्याने चूळ भरल्यास फायदा होईल.

६. पावसाळ्यात पायांच्या नखांमध्ये घाण साचून तो दुखू लागतो अशावेळी तुरटी व हळदी गरम करुन त्या भागी लावल्यास आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT