Non-Sleep Deep Rest Saam Tv
लाईफस्टाईल

Non-Sleep Deep Rest : वर्कप्लेसवरील कामाचा ताण 20 मिनिटांत घालवा, कसा? जाणून घ्या

NSDR Benefits : आजच्या काळात लोकांवर कामाचे खूप दडपण आहे. अनेक वेळा भार इतका वाढतो की तणावामुळे झोप नीट येत नाही.

Shraddha Thik

What Is NSDR :

आजच्या काळात लोकांवर कामाचे खूप दडपण आहे. अनेक वेळा भार इतका वाढतो की तणावामुळे झोप नीट येत नाही. अशा स्थितीत, NSDR ची युक्ती म्हणजेच नॉन-स्लीप डीप रेस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

20 ते 30 मिनिटांची ही युक्ती तुम्हाला 7 ते 8 तासांची झोप मिळाल्यासारखे आरामशीर वाटू शकते. यामुळे तुमचा ताणही (Stress) दूर होतो आणि तुमचा थकवाही कमी होतो. नॉन-स्लीप डीप रेस्ट म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते ते जाणून घ्या.

नॉन-स्लीप डीप रेस्ट म्हणजे काय?

नॉन-स्लीप डीप रेस्टची ओळख स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनच्या डॉ. अँड्र्यू ह्युबरमन यांनी केली. यामध्ये 20 ते 30 मिनिटे डोळे मिटून झोपावे. 20 ते 30 मिनिटांच्या या प्रक्रियेत ध्यान केले जाते. हे एक टेक्निक आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तणाव, चिंता आणि नैराश्य दूर करू शकता.

तुम्ही तुमची काम करण्याची  क्षमता (Capacity) वाढवण्यासाठी तसेच शिकण्याची क्षमता देखील सुधारण्यासाठी नॉन-स्लीप डीप रेस्ट ही टेक्निकचा वापर करू शकता. जर तुम्हाला रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर NSDR या टेक्निकच्या साहाय्याने तुम्ही तुमचे मन आणि शरीर यांना सहज आराम देऊ शकता. तसेच झोप येण्यासाठी आणि एकाग्र राहण्यासाठी हे टेक्निक सर्वोत्तम मानले जाते.

हे तंत्रज्ञान भारतासाठी खूप जुने आहे

नॉन-स्लीप डीप रेस्ट हे जगासाठी नवीन टेक्निक असेल, पण भारतासाठी ते खूप प्राचीन आहे. भारतात याला योगनिद्रा म्हणून ओळखले जाते. याचा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आढळतो.

योग निद्रा ही भारताची (India) देणगी आहे असे म्हटले जाते. योग निद्राद्वारे मेंदूतील न्यूरॉन्स अनेक लहरी निर्माण करतात. यातील अल्फा लहरी आपल्याला आनंदी ठेवण्याचे काम करतात. योग निद्राच्या सरावाने अल्फा लहरींची क्रिया वाढतात आणि तणाव कमी होतो. त्यामुळे मेंदूला आराम मिळतो. एनएसडीआरमागील विज्ञान देखील योग निद्रासारखेच आहे.

योग निद्रा पद्धत

  • शांत आणि अंधुक प्रकाश असलेल्या ठिकाणी आपल्या पाठीवर झोपा.

  • शरीर सैल सोडा आणि तळवे उघडा. तुमचा चेहरा आकाशाकडे ठेवा आणि डोळे बंद करा.

  • एक दीर्घ श्वास घ्या. यानंतर, सामान्यपणे श्वास घेताना, उजव्या पायाच्या बोटावर लक्ष केंद्रित करा.

  • यानंतर, आपले लक्ष पायाच्या बोटांपासून गुडघ्यांकडे आणि नंतर मांड्यांकडे आणा. दुसऱ्या पायावरही ही प्रक्रिया पुन्हा करा.

  • त्याच पद्धतीने पुढे जाताना पोट, घसा, छाती आणि शरीराच्या इतर भागांकडे डोक्यापर्यंत लक्ष द्या.

  • नंतर दीर्घ श्वास घ्या आणि डोळे मिटून काही वेळ शांतपणे झोपा.

  • यानंतर उजव्या बाजूला वळा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा.

  • काही वेळाने उठून बसा आणि हळू हळू डोळे उघडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT