Aadhar Card And Mobile No. Linked Saam Tv
लाईफस्टाईल

Aadhar Card And Mobile No. Linked : आता फोन नंबरवरुन होणार आधार कार्ड लिंक ! कोणत्याही कागदपत्रांची भासणार नाही आवश्यकता...

Aadhar Card : धार कार्ड किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, त्याशिवाय तुम्हाला सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mobile No. Linked To Aadhar Card : आधार कार्ड किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, त्याशिवाय तुम्हाला सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. आपली अनेक कामे आधारशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. बँकांसह अनेक ठिकाणी आधारसोबत ओटीपी आवश्यक आहे.

अशा परिस्थितीत तुमच्या मोबाईल (Mobile) नंबरची आधारशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डमध्ये टाकायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची (Documents) गरज भासणार नाही. चला, त्याशिवाय काम कसे होणार.

भारतीय (Indian) युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ने सांगितले की, जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डमध्ये लिंक करायचा असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर आता ते सोपे होणार आहे.

अपडेटसाठी, तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर घेऊन जावे लागेल. याशिवाय फोटो (Photo), बायोमेट्रिक आणि ई-मेल यांसारख्या दुरुस्त्याही तुमच्या आधारमध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय अपडेट केल्या जातील.

मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्याचे फायदे -

मोबाईल नंबर मोबाईल कार्डशी लिंक करण्याचे अनेक फायदे असले तरी सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल तरच तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला तुमच्या आधारमध्ये कोणतेही अपडेट करायचे असेल, तर त्यासाठी तुमचा OTP फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT