ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आधारकार्ड वापरकर्त्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे.
अशा पध्दतीने तुम्ही तुमचे आधारकार्ड अपडेट करून घ्या
सर्वप्रथम आधार कार्ड (UIDAI) च्या वेबसाईट किंवा अँप वर जा.
लॉगिन वर क्लीक करून , आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाकून SEND OTP वर क्लीक करा.
तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक सहा अंकी OTP मिळेल तो टाकून लॉगिन करा.
पुढच्या पेज वर सर्वात शेवटी डॉक्युमेंट अपडेट चा पर्याय तुम्हाला दिसेल.
पुढे दोन पेज वर कोणते डॉक्युमेंट्स हवे हे येईल ते वाचून त्यांना नेक्स्ट करा.
पुढे तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता दिसेल तो तपासून टिक करून नेक्स्ट करा.
पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला येईल तिथे JPG, PNG आणि PDF फॉरमॅट मध्ये ५ MB पर्यंत फाईल तुम्ही अपलोड करू शकता.
आयडी प्रूफ आणि पत्ता यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील याची पूर्ण लिस्ट इथे दिसेल त्यातील कोणताही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता.
अश्या प्रकारे सर्व डॉक्युमेंट अपलोड करा.