Wegovy Injection  Saam tv
लाईफस्टाईल

Wegovy Injection : झटपट वजन कमी करणारं वेगोवी इंजेक्शन भारतात मिळणार, किंमत ठरली

Wegovy injection price : डेन्मार्कची औषध निर्माता कंपनी नोवो नॉर्डिस्क कंपनीने वजन कमी करण्यासाठी इंजेक्शन भारतात लाँच केलंय.

Vishal Gangurde

मुंबई : अनेक व्यक्ती वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतात. जगभरात काही कंपन्यांनी वजन कमी करण्यासाठी सप्लीमेंट, पावडर, इजेंक्शन तयार केलं आहे. या औषधांचा वापर अनेक लोक करू लागले आहेत. याचदरम्यान डेन्मार्कची औषध निर्माता कंपनी नोवो नॉर्डिस्क कंपनीने वजन कमी करण्यासाठी इंजेक्शन भारतात लाँच केलं आहे. वेगोवी (सेमाग्लूटाइट) असं या इंजेक्शनचं नाव आहे. वेगोवी इंजेक्शन आठवड्यातून एकदा घेता येईल. त्याची किंमतही निश्चित झाली आहे.

भारतात मौंजारोनंतर वेगोवी इंजेक्शन अधिकृतरित्या लाँच करण्यात आलं आहे. भारताव्यतिरिक्त अन्य देशांमध्ये ओजेम्पिक, मौंजारो आणि वेगोवी या तिन्ही औषधांचा वापर केला जातो. अमेरिका आणि युरोपमध्ये चांगला रिझल्ट दिल्यानंतर वेगोवी औषध भारतात २४ जून रोजी लाँच करण्यात आलं. वेगोवी इंजेक्शनची भारतात किंमत 17,345 रुपये इतकी आहे.

GLP-1 रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट हे वेगोवी सेमाग्लूटाइडच्या उच्च मात्रेतील फॉर्म्युलेशनचे ब्रँड नाव आहे. वेगोवी इंजेक्शन मुळात टाइप 2 डायबेटीसच्या उपचारासाठी डिझाइन केले गेले आहे. वेगोवी आवठड्यातून एकदा दिलं जाणारं इंजेक्शन आहे.

वजन कमी इंजेक्शनचा वापर करणे धोकादायक? आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं काय?

जनरल सर्जन डॉ. जयश्री तोडकर सांगतात, 'वजन कमी करण्यामागे मेडिकल सायन्सचा देखील आधार आहे. कारण वजन फक्त दिसण्याशी संबंधित नाही. वाढत्या वजनामागे सुमारे शंभर प्रकारचे गंभीर आजार असू शकतात. अनेक दशकांपासून लोक वजन कमी करण्यासाठी डाएटिंग किंवा खूप व्यायाम करतात. पण काही वेळा शरीराची रचना किंवा जनुकीय कारणांमुळे हे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. आतापर्यंतच्या वैज्ञानिक संशोधनातून हे समोर आलं आहे की आपल्या पचनसंस्थेत काही विशिष्ट प्रकारची रसायने तयार होतात. जी कॅलरी आणि साखरेच्या वापरावर परिणाम करतात. गेल्या काही दशकांतील संशोधनातून अशा काही मॉलिक्युल्सचा शोध लागला आहे, जे कॅलरीचा वापर वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे विज्ञान आता त्या आधारे औषधे तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे'.

'साखर आणि कॅलरीच्या नियंत्रणासाठी ही औषधे उपयुक्त ठरू शकतात. मात्र त्याचबरोबर आहार आणि व्यायाम हेदेखील महत्त्वाचे घटक आहेत. ही औषधे विशिष्ट बॉडी मास इंडेक्स म्हणजे की BMI 35 वयापर्यंत असलेल्या लोकांमध्ये प्रभावी ठरतात. मात्र, BMI 35 वयाच्या पुढे गेल्यावर आणि इतर आजार उपस्थित असताना ही औषधे कितपत उपयोगी पडतात हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासणी करून आणि व्यवस्थित काळजी घेऊन इंजेक्शन्स घेतली तर वजन निश्चितच कमी होऊ शकतं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT