Diabetes Symptoms in Morning saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Symptoms: सकाळी उठल्यावर 'ही' लक्षणं दिसली तर समजा डायबेटीज झालाय, वेळीच ब्लड शुगर टेस्ट करा

Diabetes Symptoms in Morning: मधुमेहाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. वारंवार लघवी होणं हे मधुमेहाचं एक सामान्य लक्षण मानलं जातं. याशिवाय सकाळी मधुमेहाची कोणती लक्षणं जाणवतात ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या लाईफस्टाईल निगडीत आजारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. मुळात ज्यावेळी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिनची कमतरता निर्माण होऊ लागते. ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. मधुमेहाला सायलेंट किलर असेही म्हणतात. मधुमेहामुळे व्यक्ती इतर अनेक गंभीर आजारांना बळी पडते.

मधुमेह, किडनी, यकृत आणि हृदयरोगांचा धोका वाढतो. मधुमेहाची लक्षणं खूप सामान्य आहेत, म्हणूनच बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र मधुमेहाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. वारंवार लघवी होणं हे मधुमेहाचं एक सामान्य लक्षण मानलं जातं. याशिवाय सकाळी मधुमेहाची कोणती लक्षणं जाणवतात ते पाहूयात.

तोंड सुकणं

जर तुम्हाला सकाळी उठताच तोंड किंवा घसा कोरडा वाटत असेल तर हे मधुमेहाचं लक्षण असू शकतं. मधुमेहामुळे तोंड कोरडं पडू शकतं. मुळात रक्तातील ग्लुकोजच्या उच्च पातळीमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे तोंड कोरडे पडते.

थकवा वाटणं

सकाळी उठल्याबरोबर थकवा जाणवणं हे देखील मधुमेहाचं लक्षण मानलं जातं. मधुमेहाच्या रुग्णांना जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर अनेकदा थकवा किंवा सुस्ती वाटत असेल, तर या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे.

धुसर दिसणं

मधुमेहामुळे सकाळी उठताच एखाद्या व्यक्तीला धुसरं दिसत असेल तर ते मधुमेहाचं लक्षणं असू शकतं. मधुमेहामुळे सकाळी दृष्टी अंधुक होऊ शकते. मधुमेहाचा डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे डोळ्यांच्या लेन्सला सूज येते, ज्यामुळे लेन्सचा आकार बदलतो. त्यामुळे ही समस्या जाणवते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT