SBI Scheme Saam Tv
लाईफस्टाईल

SBI Scheme : आता मुलांच्या शिक्षणाची अन् लग्नाची चिंताच सोडा! एसबीआयची 'ही' जबरदस्त योजना करणार टेंशन दूर

या महागाईमुळे मुलांना योग्य शिक्षण देणेही प्रचंड खर्चिक झाले आहे.

कोमल दामुद्रे

SBI Scheme : सध्या देशभरात वाढत्या महागाईने नागरिक चांगलेच त्रस्त आहेत. वाढती महागाई आणि शालेय संस्थांची भरमसाठ फी यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या महागाईमुळे मुलांना योग्य शिक्षण देणेही प्रचंड खर्चिक झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवून पालकांना त्यांच्या भविष्यासाठी सेविंग करने सध्याच्या काळात अशक्या आहे.

मात्र एसबीआयने अशी एक जबरदस्त स्किम आणली आहे ज्याद्वारे तुमचे मुलांच्या (Child) शिक्षणासह लग्नाचेही टेंशन दूर होणार आहे. एसबीआयच्या चाईल्ड प्लॅन फिक्स्ड डिपोझिट या योजने अंतर्गत SBI Life Smart Champ Insurance आणि SBI Life Smart Scholar या दोन स्किम राबवल्या जातात. ज्यामध्ये आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने सेविंग करता येते. जाणून घेऊया या दोन्ही योजनांबद्दल सविस्तर माहिती.

SBI लाईफ - स्मार्ट चॅंम्प इंशुरन्स

एसबीआयच्या या योजनेअंतर्गत एक लाख रुपये गुंतवून १ कोटी रुपये मिळवता येतात. यामध्ये मासिक, तिमाही, सामाही आणि वार्षिक अशी गुंतवणूक करता येते. २१ ते ५० वय असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेवू शकते. यामध्ये मुलाचे वय हे ०-१३ पर्यंत असायला हवे. या योजनेत (Scheme) मुलाचे सज्ञान होण्याचे वय हे २१ वर्ष असून मुलाच्या वयाची १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर चार वार्षिक टप्प्यात ही रक्कम दिली जाणार आहे.

SBI च्या या योजनेत गुंतवणूक केल्यावर ग्राहकांना विम्याचा लाभ दिला जातो. दुर्दैवी अपघात झाल्यास, या योजनेअंतर्गत विमा रकमेच्या 105% पर्यंत रक्कम दिली जाऊ शकते. तसेच ही योजना तुमच्या SBI खात्याशी थेट लिंक केली जाऊ शकते, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा गुंतवणूक करण्याची गरज भासणार नाही.

एसबीआय लाईफ - स्मार्ट स्कॉलर

  • ही एसबीआय लाइफची वैयक्तिक, युनिट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग जीवन विमा योजना आहे.

  • यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पालकांचे वय 18 ते 57 वर्षे आणि मुलाचे वय 0 ते 17 वर्षे असावे.

  • तुम्ही या पॉलिसीमध्ये किमान 8 वर्षे आणि कमाल 25 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.

  • यामध्ये मुलाचे मॅच्युरिटी पिरियड वय 18 ते 25 वर्ष आहे.

  • या योजनेत तुम्हाला अपघात विमाही दिला जातो. याशिवाय कर लाभही मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइननेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT