Heart attack news saam t
लाईफस्टाईल

Night Heart Attack: झोप पूर्ण होत नाहीये? रात्रीत येऊ शकतो हार्ट अटॅक, जाणून घ्या लक्षणे

Heart Health: रात्री किंवा पहाटे हृदयविकाराचा धोका असतो. लक्षणे सौम्य असू शकतात. योग्य काळजी, आरोग्यदायी जीवनशैली, ताण कमी करणे आणि तातडीने उपचार घेणे जीवन वाचवते.

Sakshi Sunil Jadhav

धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना झोप पुर्ण न होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. दिवसाची सुरुवात जर अपूर्ण झोपेत करावी लागत असेल तर शरीरावर त्याचा गंभीर परिणाम जाणवायला लागतो. या सामान्य वाटणाऱ्या समस्येमुळे तुम्हाला हार्ट अटॅक आजाराच्या धोक्याला सामोरे जावे लागू शकते. पुढे आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जगभरात हार्ट अटॅकचे रुग्ण वाढत चालले आहेत. याची मुख्य कारणे म्हणजे दिवसभराचा ताण-तणाव, थकवा किंवा चिडचिड, आरडाओरडा हृदयविकार होतो असे मानलं जातं. मात्र, वैद्यकीय अभ्यासात असं म्हणतात की, अनेकांना हार्ट अटॅक रात्री झोपेत किंवा पहाटेच्या वेळेस येतात. याचं कारण म्हणजे शरीराच्या सर्केडियन रिदममुळे रात्री हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि हार्मोन पातळीवर परिणाम होतो. ज्यामुळे हृदयावर जास्त ताण येतो आणि झटके येण्याची शक्यता वाढते.

जगातील अनेक लोकांना माहिती नसतं की रात्री हार्ट अटॅकची लक्षणं हलकी हलकी जाणवत असतात आणि सहज दुर्लक्षित होऊ शकतात. म्हणून वेळेवर लक्ष देणं आणि तातडीने उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हार्ट अटॅक हा रक्तप्रवाह हृदयाकडे कमी होणं किंवा थांबल्यामुळे होतो. कोरोनरी आर्टरीजमध्ये प्लॅक फॅटी, कोलेस्टेरॉलयुक्त थर जमल्यामुळे रक्त प्रवाहात अडथळे निर्माण होऊ शकतात. जर प्लॅक फुटला, तर रक्तात गाठी तयार होऊ शकतात, जे हृदयाच्या पेशींवर ताण आणतात आणि नुकसान करतात.

छातीत दुखणे, श्वास घेताना छातीत कळ येणे, हात, माने, तोंड, पाठ किंवा पोटातही जाणवू हार्ट अटॅकचा त्रास जाणवू शकतो, आणि झोपेत आल्यावर ती जास्त लक्षात येऊ शकतात. श्वास घेताना त्रास, अचानक जाग येणे, किंवा श्वास घेण्यात अडचण वाटणे ही हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. भरपूर घाम, थंड किंवा दमट त्वचा, अथवा अचानक रात्री घाम येणे, हे हृदयावर ताण असल्याचे दर्शवते. चक्कर, डोके गरगरणे किंवा बेशुद्ध पडणे हे हृदय किंवा मेंदूतील रक्त प्रवाह कमी झाल्याचे संकेत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : १५ रूपये कपातीच्या निर्णयाचा निषेधार्थ आंदोलन करणार - राजू शेट्टी

मोठी बातमी! गौतमी पाटील प्रकरणात पुणे पोलिसांना थेट केंद्रीय मंत्र्याचा फोन|VIDEO

Coaching Class Explosion: कोचिंग क्लासमध्ये भीषण स्फोट, २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती गंभीर

Shocking : भिवंडीत धर्मांतराचा खेळ; उपचाराच्या नावाने करायचा बदलाचा धर्म, अमेरिकेतून आलेल्या तरुणाचा प्रकार

Manoj Jarange Patil: आता परिणामाची चिंता नाही, विरोध करणाऱ्याला संपवायचं; जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT