Norway Saam Tv
लाईफस्टाईल

जगातील एक देश, जेथे रात्र असते फक 40 मिनिटांची! जाणून घ्या रोचक गोष्ट

जगात अनेक असे देश आहेत जे सौंदर्याने नटलेले आहेत. परंतु या जगात एक असा देश आहे ज्याला सुंदरतेसोबाबत एक खास वैशिष्टय देखील आहे. होय!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: जगात अनेक असे देश आहेत जे सौंदर्याने नटलेले आहेत. परंतु या जगात एक असा देश आहे ज्याला सुंदरतेसोबाबत एक खास वैशिष्टय देखील आहे. होय! युरोप मध्ये एक असा देश आहे जो सुंदरतेत परिपूर्ण आहेच पण हा देश एका चमत्कारापेक्षा कमी नाही आणि यामागील कारण देखील खूप खास आहे. कारण या देशात फक्त 40 मिनिटासाठी रात्र होते. या देशबद्दल ही गोष्ट ऐकून लोक आश्चर्यचकित होऊन जातात. लोकांना वाटते की, असे कासकाय होऊ शकते? पण हो हे सर्व खरे आहे. चला तर मग जाऊन घेऊयात या देशनाबद्दल काही रंजक गोष्टी... (Unique Countries In The World)

जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक;

या अनोख्या देशाचे नाव नॉर्वे आहे. माहितीसाठी, नॉर्वे एकीकडे जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे, तर दुसरीकडे जगातील सर्वात सुंदर देशांमध्ये देखील त्याचा समावेश आहे. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य असे आहे की, जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे भेट देण्यासाठी आवर्जून येतात. नॉर्वेचे बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवेगार टेकड्या वर्षभर पर्यटकांना येथे येण्यासाठी आकर्षित करतात. इथे आपल्याला असे अप्रतिम नजारे पाहायला मिळतात, जे क्वचितच कुठे पाहायला मिळतील. तसेच हा देश अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला आहे.

Norway

40 मिनिटाची असते रात्र;

होय! या सुंदर नॉर्वेमध्ये जेव्हा बर्फवर्षाव होतो तेव्हा येथील शहरांचे रूप कमालीचे सुंदर दिसते. तसेच नॉर्वेची राजधानी ओस्लो मध्ये बनलेले लहान आकाराचे घरे आकर्षक असतात. यात हैराण करणारे गोष्ट आहेत की, हा देश आर्क्टिक सर्कलमध्ये वसलेला असल्यामुळे नॉर्वेमध्ये सूर्यास्त फक्त 40 मिनिटांसाठी असतो.तर नॉर्वेचे रोरोस शहर हे सर्वात थंड प्रदेश मनाला जातो. येथील तापमान (-50 Degree) एवढे कमी नोंदवले जाते. (Interesting Facts About Norway)

Norway

Land of the Midnight Sun:

नॉर्वेला लँड ऑफ मिडनाईट असे देखील म्हणले जाते. कारण येथे रात्री 12 वाजून 43 मिनिटाला सूर्यास्त होते आणि लगेच 40 मिनिटानंतर पुन्हा सूर्योदय होतो. तसेच एक सत्य हे देखील आहे की, येथे मे ते जुलै दरम्यान म्हणजेच जवळजवळ 76 दिवस सूर्यास्त होत नाही. उत्तर नॉर्वेत तर हिवाळ्याच्या दिवसात सूर्य उगवतच नाही. याप्रकारे रहस्यांनी भरलेला हा देश पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो.

Norway

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, 'येथे' घ्या क्षणभर विश्रांती

Shocking: 'ती'ओरडत राहिली पण..१० वर्षीय चिमुकलीचे नराधम पित्याने लचके तोडले, आईला कळताच..

SCROLL FOR NEXT