Kali Mata Temple Saam Tv
लाईफस्टाईल

Chinese Temple : अरेच्चा ! प्रसादात ठेवतात नूडल्स, चायनीज लोक करतात 'या' देवीची पूजा

भारतात अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत, त्यांच्या संबंधित रंजक गोष्टी इतरांपेक्षा खूप वेगळ्या बनवतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kali Mata Temple : भारतात अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत, त्यांच्या संबंधित रंजक गोष्टी इतरांपेक्षा खूप वेगळ्या बनवतात. भारतात एक मंदिर (Temple) देखील आहे ज्याला चायनीज काली मंदिर म्हणतात. विशेष म्हणजे येथे नूडल्सचा प्रसाद दिला जातो. हे पाहण्यासाठी आपल्याला भारतातील या शहरात जावे लागेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील 'चायनीज काली टेम्पल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिरात नूडल्स, मोमोजपासून ते भात आणि भाजीपाला (Vegetables) पदार्थांपर्यंत प्रसाद मिळतो. हे मंदिर कोलकात्याच्या माथेश्‍वरताला रोडवर वसलेले आहे, टांगरा याला 'चायना टाउन' देखील म्हणतात.

Kali Mata Temple

माता दुर्गेच्या रूपात कालीची पूजा करण्यासाठी चिनी समुदाय येथे जमला होता आणि एका क्षणी प्रत्येकजण झाडाखाली पूजा करू लागला आणि आज ते एक प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भाविकांना प्रसादाच्या रूपात नूडल्स दिले जातात आणि यामुळे ते इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे.

टेंगरा येथे बौद्ध आणि ख्रिश्चन प्रथा अधिक पाळल्या जात असल्या तरी नवरात्रीच्या काळात येथील कालीपूजेचे वेगळेच सौंदर्य पाहायला मिळते. हे मंदिर १९९८ मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.

अख्यायिका -

फार पूर्वी एका चिनी जोडप्याचा मुलगा खूप आजारी होता. हे जोडपे आई कालीच्या आश्रयाला आले आणि काही वेळाने त्यांचे मूल बरे झाले. असे मानले जाते की, तेव्हापासून येथे उपस्थित असलेल्या चिनी समुदायामध्ये माता कालीवरील श्रद्धा वाढली आणि त्यांनी तिची पूजा करण्यास सुरुवात केली.

Edited By - Shraddha Thik

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT