Night Owl Risks saam tv
लाईफस्टाईल

Night Owl Risks : रात्री उशिरा झोपण्याची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक; शरीरावर होतात हे गंभीर परिणाम

आधुनिक जीवनशैलीमुळे रात्री उशिरापर्यंत जागत राहण्याची सवय अनेकांना जडली आहे, जी शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. पुरेशा झोपेच्या अभावामुळे केवळ मानसिकच नव्हे, तर संपूर्ण शारीरिक स्वास्थ्य बिघडते आणि शरीरावर गंभीर परिणाम होतात.

Saam Tv

निरोगी राहण्यासाठी योग्य खानपान आणि जीवनशैली असणे अत्यंत गरजेचे आहे. शारीरिक हालचालींसोबतच शरीराला पुरेशा विश्रांतीची म्हणजेच पुरेशा झोपेची गरज असते. यासाठी दररोज योग्य वेळी झोपणे आणि 7-8 तासांची गाढ झोप घेणे आवश्यक आहे. परंतु, आधुनिक जीवनशैलीत काम, पार्ट्या किंवा मोबाईलवर सतत वेळ घालवणे यामुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागत राहतात, ज्यामुळे त्यांच्या रोजच्या दिनचर्येवर वाईट परिणाम होतो.

जर तुम्हालाही दररोज रात्री 12-1 वाजेपर्यंत जागत राहण्याची सवय असेल, तर ही सवय तातडीने बदलणे गरजेचे आहे. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे केवळ मानसिकच नव्हे, तर शारीरिक स्वास्थ्यही बिघडते. दररोज रात्री उशिरा झोपल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात, हे जाणून घेऊया.

उशिरा झोपणे

रात्री उशिरा झोपल्यामुळे हळूहळू ही सवय अंगवळणी पडते आणि संपूर्ण स्लीप पॅटर्न बिघडून जातो. याचा परिणाम केवळ झोपेवरच होत नाही, तर भूख, हार्मोन्स आणि चयापचय क्रिया देखील प्रभावित होतात. मेटाबोलिझम मंदावल्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते. आपले शरीर एका नैसर्गिक बायोलॉजिकल क्लॉकनुसार कार्य करते, जी आपली झोप, भूक आणि ऊर्जेचा वापर नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

हार्मोन्स आणि भूकेवर परिणाम

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण उशिरापर्यंत जागत राहतो किंवा पुरेशी झोपत नाही, तेव्हा भूक आणि पोट भरल्याची जाणीव करून देणाऱ्या हार्मोन्सचा समतोल बिघडतो. यामुळे खाण्याच्या अनियमित सवयी वाढतात. याशिवाय, उशिरापर्यंत जागल्यामुळे काहीतरी खाण्याची किंवा प्रामुख्याने गोड खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.

वजन वाढणे आणि मधुमेहाचा धोका

उशिरापर्यंत जागत राहण्याच्या सवयीमुळे केवळ हार्मोन्सच बिघडत नाहीत, तर खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल होतो. जर तुम्ही दीर्घकाळपर्यंत रात्री उशिरा जेवत असाल किंवा गोड खात असाल, तर त्याचा इन्सुलिन संवेदनशीलता आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

आपली दिनचर्या योग्य ठेवा

तज्ज्ञांच्या मते, निरोगी मेटाबोलिझमसाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच नियमित शारीरिक श्रम किंवा व्यायाम करणे आणि दररोज 7-9 तासांची गाढ झोप घेणे गरजेचे आहे. झोपण्याची आणि उठण्याची एक ठराविक वेळ निश्चित करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT