Netflix Free Support Plan Saam TV
लाईफस्टाईल

Netflix Free Support Plan : अरे व्वा! नेटफ्लिक्सवर फ्रीमध्ये बघता येणार आवडीचा सिनेमा? कंपनीचा पुढचा प्लान ठरला!

Netflix Free Plan : नेटफ्लिक्सवरील प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी असे केले जात असल्याचे समजले आहे. कंपनीने या आधी देखील असा फ्री प्लान आणला होता.

Ruchika Jadhav

आतापर्यंत आपल्याला यूट्यूबवर संपूर्ण कंटेन्ट फ्रीमध्ये पाहता येत होता. मात्र आत त्याच पद्धतीने नेटफ्लिक्सवर देखील फ्रीमध्ये व्हिडिओ पहायला मिळू शकतात. त्यासाठी कंपनी लवकरच नवीन प्लान प्रेक्षकांसाठी आणणार आहे. नेटफ्लिक्सच्या रिचार्ज प्लानवर अनेकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे कंपनी आता फ्री प्लानचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे, असं म्हटलं जात आहे.

कंपनीकडून यासाठी वेगळा प्लान घ्यावा लागणार आहे. नेटफ्लिक्सचा हा प्लान काही ठरावीक मार्केटमध्येच उपलब्ध असणार आहे. तुमच्या सध्याच्या प्लानला तुम्हाला अॅड न्यू प्लान करून याचा लाभ घेता येऊ शकतो. नेटफ्लिक्सच्या फ्री कंटेन्टमधील या प्लानमध्ये तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातील. या जाहिरातीतून कंपनीला प्रॉफीड मिळेल.

ब्लूमबर्गने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, आशिया आणि युरोपियन बाजारपेठांमध्ये ही स्किम सुरूवातीला सुरू होऊ शकते. येथील विविध भागांत अनेक टीव्ही नेटवर्क फ्रीमध्ये आहेत. त्यामुळे येथे नेटफ्लिक्सचा प्लान देखील मोफत मिळू शकतो. प्रेक्षकांना पैसे न भरता यामध्ये जाहिराती पहाव्या लागणार आहेत.

नेटफ्लिक्सवरील प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी असे केले जात असल्याचे समजले आहे. कंपनीने या आधी देखील असा फ्री प्लान आणला होता. २०२१ मध्ये केनियामधील अॅन्ड्रॉइट स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजन आणली होती. मात्र वर्षभराने ती बंद देखील पडली.

Netflix च्या प्लानच्या किंमती काय आहेत?

नेटफ्लिक्सचा पहिला प्लान १४९ रुपयांचा आहे. तर कंपनीचा मूळ प्लान १९९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ७२०P गुणवत्तेमध्ये कंटेन्ट दिसतो. तर ४९९ आणि ६४९ रुपयांच्या प्लानमध्ये HD गुणवत्तेसह 4K+HDR ची गुणवत्ता मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT