Women 35-40 extramarital affairs SAAM TV
लाईफस्टाईल

Extramarital affairs women: ना नवऱ्याचं टेन्शन...ना समाजाची भीती; 35-40 वयोगटातील महिला का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर?

Women 35-40 extramarital affairs: समाजातील बदलत्या मानसिकतेमुळे आणि वैयक्तिक जीवनातील ताणतणावामुळे ३५-४० वयोगटातील अनेक स्त्रिया विवाहबाह्य संबंधांकडे वळताना दिसतात.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही काळात एक्स्ट्रा मॅरेटरियल अफेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. आजकाल केवळ पुरुषच नाहीत तर महिला देखील विवाहबाह्य संबंध ठेवत असल्याचं समोर आलंय. मात्र महिला असं का करतात याचा कधी विचार तुमच्या मनात आलाय का? यामागे काय कारणं असू शकतात ते पाहूयात.

नातेसंबंध आणि विवाहांमध्ये फसवणूक झाल्याचं अनेकदा तुम्ही पाहिलं असेल. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर पार्टनर अनेकदा फसवणूक करतात. फसवणूक करणारे फक्त पुरुषच नाहीत तर महिलाही आहेत. ३५ ते ४० वयोगटातील महिला का फसवणूक करतात हे पाहूयात.

महिला आपल्या पार्टनरची फसवणूक का करतात?

महिला अनेकदा एकटेपणा, भावनिक गोष्टी आणि समाधान मिळवण्याच्या इच्छेमुळे महिला आपल्या पार्टनरची फसवणूक करतात.

इमोशनली इंविजीबल वाटणं

३५ ते ४० वयोगटातील बहुतेक महिलांना इमोशनली इंविजीबिलीटी जाणवू लागते. या वयात, त्या बहुतेकदा आई, पत्नी आणि घर सांभाळण्यात व्यस्त असतात. कुटुंबासाठी जास्त वेळ काम केल्याने स्वतः हरवून बसते. हळूहळू कुटुंबातील सदस्य देखील त्यांच्या इच्छांकडे दुर्लक्ष करू लागतात.

भावनिक नातं

या वयात महिलांना त्यांच्या जोडीदाराकडून प्रेम, समजूतदारपणा आणि इमोशनल बॉन्ड हवा असतो. मात्र जेव्हा त्यांना प्रेम, समजूतदारपणा आणि हा बॉन्ड मिळत नाही तेव्हा त्या नातं तोडण्याचा विचार करतात. भावनिक आधारावर आधारित मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमसंबंधात होतं हे सांगणं मग कठीण असतं.

बाहेरच्या व्यक्तीकडून मिळणारं

३५ ते ४० वयोगटातील महिलांचे वैवाहिक जीवन आणि घरातील वातावरण खूपच नीरस बनू शकते. अशा वयात महिला एका नित्यक्रमात अडकतात. म्हणून ज्यावेळी बाहेरून थोडासा आदर मिळतो तेव्हा त्याकडे त्या आकर्षित होतात. हेच आकर्षण महिलांना एक्स्ट्रा मॅरेटरियल अफेअर ठेवण्यास प्रवृत्त करतात.

(डिस्क्लेमर- याठिकाणी देण्यात आलेल्या गोष्टी सामान्य माहितीच्या आधारावर आहेत. आम्ही याची खातरजमा करत नाही)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Virat Kohli : विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिॲक्टिवेट की सस्पेंड? प्रोफाइल गायब झाल्याने चाहते संभ्रमात

ZP Election: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

Petrol-Diesel Price: 'तो' एक निर्णय सर्वसामान्यांना 'महागा'त पडणार,पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार

SCROLL FOR NEXT