Navratri Festival 2023 IRCTC Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Festival 2023 : IRCTC चा नवा प्लान! नवरात्रीत वैष्णोदेवी भक्तांसाठी विशेष ट्रेन, कोणत्या ठिकाणी थांबणार?

IRCTC Navratri Plan : गणेशोत्सवानंतर लोक नवरात्री सणाची वाट पाहत असतात. या नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे.

Shraddha Thik

IRCTC Package For Vaishno Devi:

गणेशोत्सवानंतर लोक नवरात्री सणाची वाट पाहत असतात. या नवरात्रीच्या प्रत्येक नऊ दिवसांचे वेगळे महत्त्व आहे. या नऊ दिवसांत विविध देवींच्या रुपांची आराधना करतात. तसेच अनेकजण शक्तिपीठांना तर काहीजण नऊ देवींचे दर्शन घेण्यास जातात. बऱ्याचदा लोक नवरात्रीत कटरा येथे स्थित वैष्णोदेवीच्या आशिर्वाद घेण्यासाठी मंदिराला (Temple) भेट देतात. तसेच देवीची मनोभावे आराधना करतात.

ट्रेनचे तपशील तपासा :

ट्रेन क्रमांक 01654 श्री माता वैष्णो देवी-वाराणसी विशेष ट्रेन (Train) कटरा येथून दर रविवारी रात्री 11:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11:55 वाजता वाराणसीला पोहोचेल. ही ट्रेन 22 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान धावणार आहे. परतीच्या वेळापत्रकासाठी, 01653 वाराणसी – श्री माता वैष्णो देवी विशेष ट्रेन वाराणसीहून दर मंगळवारी सकाळी 06.20 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 11:20 वाजता डेस्टिनेशनवर पोहोचेल.

या गाड्या दिल्लीहून उपलब्ध असतील -

दिल्लीहून इतर काही विशेष गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. उत्तर रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक रेखा शर्मा यांनी सांगितले की ट्रेन क्रमांक 04080 नवी दिल्ली-वाराणसी विशेष ट्रेन 6 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान धावेल. ही ट्रेन नवी दिल्लीहून दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7 वाजता धावेल. रात्री 2:00 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 09:45 वाजता वाराणसी स्थानकावर पोहोचेल.

ट्रेनच्या परतीच्या वेळापत्रक (Timetable), ट्रेन क्रमांक 04079 वाराणसी-नवी दिल्ली विशेष ट्रेन वाराणसीहून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी संध्याकाळी 6:35 वाजता सुटेल आणि ती 7 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 पर्यंत धावेल. दिल्लीत ट्रेनची वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी 9:00 वाजता असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, पोलिसांची परवानगी

Ranveer Singh: या हॉरर चित्रपटाचा भाग होणार रणवीर सिंग, लवकरच होईल चित्रपटाची घोषणा

Maharashtra Politics : शरद पवार - अजित पवार यांची भेट, तासभर चर्चेत नेमकं काय झालं? | VIDEO

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

SCROLL FOR NEXT