Navratri 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri 2022 : नवरात्रीत ऑफिस वर्क करणाऱ्यांनी 'या' पदार्थांचे सेवन करा, दिवसभर रहाल ऊर्जावान

नऊ दिवसांचा उपवास केल्यानंतर ऑफिस वर्क करणारे किंवा इतर अनेक लोकांना अशक्तपणा येऊ लागतो.

कोमल दामुद्रे

Navratri 2022 : सध्या भारतात सगळीकडे नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. कालपासून सुरु झालेल्या या नवरात्री उत्सवाला हिंदू धर्मात अधिक महत्त्व दिले जाते.

नवरात्रीच्या नऊ दिवसात नवदुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या नवरात्रौत्सवात अनेक भक्तगण देवीची मनोभावे भक्तीभावाने पूजा करतात. या नऊ दिवसात अनेक जण उपवास देखील करतात.

नऊ दिवसांचा उपवास केल्यानंतर ऑफिस (Office) वर्क करणारे किंवा इतर अनेक लोकांना अशक्तपणा येऊ लागतो. शरीर सतत हायड्रेट राहण्यासाठी व अशक्तपणा न येण्यासाठी आपण आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया.

१. साबूदाणा -

Sabudana

साबूदाणा शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे. साबूदाणा हा एनर्जी देण्याचे काम करतो. उपवासात साबूदाणा खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहाते. साबुदाण्याची खीर, खिचडी आणि टिक्की इत्यादी अनेक प्रकारे तुम्ही खाऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, साबुदाणामध्ये भरपूर प्रोटीन असते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. त्यामुळे जर तुम्ही उपवासाच्या वेळी ऑफिसला जात असाल तर साबुदाण्याचे सेवन जरूर करा.

२. मखाने -

Makhane

मखाने शरीरासाठी फायदेशीर आहे. मखान्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. दुसरीकडे नवरात्रीत मखाने खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. मखाने खाल्ल्याने शरीरात ऊर्जावान राहाते. त्यामुळे नवरात्रीत तुम्ही याचे रोज सेवन करू शकता.

३. शेंगदाणे-

Peanut

शेंगदाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे उपवासाच्या वेळी तुम्ही याचे सेवन करू शकता.

४. फळे -

Fruits

उपावासाच्या वेळी अधिकतर पाणीदार फळे (Fruit) खाल्ल्याने फायदा होतो. पोट भरलेले राहाते व डिहायड्रेशनची समस्या अधिक जाणवत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT