Navratri 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri 2025: 21 की 22 सप्टेंबर, यंदा कधी आहे नवरात्री उत्सव? जाणून घ्या तारीख अन् घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

यंदा शारदीय नवरात्री कधी आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सविस्तरपणे जाणून घेऊया नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाणार आहे.

Manasvi Choudhary

हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला फार पूर्वीपासून विशेष महत्व आहे. पंचागानुसार, शारदीय नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. दरवर्षी नऊ दिवस मोठ्या भक्तीभावाने देवीची पूजा करत नवरात्री साजरी केली जाते.

नवरात्री या सणांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दरम्यान भाविक नऊ दिवस व्रत पाळतात. उपवास धरतात. यंदा शारदीय नवरात्रीला कधी पासून सुरूवात होते हे जाणून घ्या

शारदीय नवरात्री कधी आहे?

यंदा शारदीय नवरात्री २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. नवरात्रीची सुरूवात घटस्थापनेने होते तसेच २ ऑक्टोबरला रोजी संपणार आहे.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

वैदिक पंचागानुसार, शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ०६:०९ पासून सुरू होईल आणि सकाळी ०८:०६ पर्यंत आहे. कलश स्थापनाचा वेळ १ तास ५६ मिनिटे असेल. तुम्हाला जर सकाळी मुहूर्तावर कलश स्थापित करू शकत नसाल तर तुम्ही अभिजीत मुहूर्तावर देखील कलश स्थापित करू शकता, जो मुहूर्त सकाळी, ११ : ४९ ते दुपारी १२ :३८ पर्यंत असेल.

नवरात्रीचे नऊ दिवस, कोणत्या देवीची पूजा आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे जाणून घ्या

२२ सप्टेंबर २०२५- प्रतिपदा तिथी, माता शैलपुत्री पूजा - रंग पांढरा

२३ सप्टेंबर २०२५- द्वितीया तिथी, मी ब्रम्हचारिणी पूजा- रंग लाल

२४ सप्टेंबर २०२५- तृतीया तिथी, माँ चंद्रघंटा - रंग निळा

२५ सप्टेंबर २०२५- तृतीया तिथी - रंग पिवळा

२६ सप्टेंबर २०२५- चतुर्थी तिथी माता कूष्मांडा - रंग हिरवा

२७ सप्टेंबर २०२५- पंचमी तिथी, माँ स्कंदमाता पूजा - रंग राखाडी

२८ सप्टेंबर २०२५- पष्ठी तिथी, माँ कात्यायनी पूजा - रंग केशरी

२९ सप्टेंबर २०२५ सप्तमी तिथी, माँ कालरात्री पूजा - रंग मोरपंखी

३० सप्टेंबर २०२५- महाअष्टमी तिथी, माँ महागौरी - रंग गुलाबी

१ ऑक्टोबर २०२५- महानवमी सिद्धीरात्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT