नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला विशेष महत्व असते. काही व्यक्ती अष्टमीला कन्या पुजन करतात. तर कही व्यक्ती नवमीला कन्या पुजन करतात. दोन्ही दिवस हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे मानले जातात. या दिवसांमध्ये घरी कुमारीका मुलींची पुजा करणे भाग्याचं आणि शुभ काम मानलं जातं.
या दिवशी लहान मुलींना घरी बोलावलं जातं. त्यांना पंचपक्वानाचे जेवण, गोड पदार्थ आणि काही गिफ्ट्स सुद्धा दिले जातात. त्यात आता मुलींना कन्या पुजन करताना कोणते गिफ्ट्स द्यावेत आणि कोणते गिफ्ट्स देऊ नयेत याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
कुमारीका मुलींना कन्या पुजनाला बोलवताना ८ किंवा ९ मुलींना बोलावले जाते. हा आकडा अगदी शुभ मानला जातो. तुम्ही ८ आणि मुलींसह आणखी जास्त मुलींना देखील घरी पुजेसाठी आमंत्रित करू शकता. त्यासाठी तुम्ही मुलींना पुढील वस्तू द्याव्यात.
मुलींची सुंदरता त्यांच्या केसांत असते असे म्हणतात. मुलींना लांब मोठे केस असतील तर त्या फार सुंदर दिसतात. अशात तुम्ही गिफ्ट्समध्ये हेअर एक्सेसरीज देऊ शकता. मुलींना या वस्तू फार आवडतात आणि त्या आवडीने क्लिप, हेअरबँड अशा विविध वस्तू वापरतात.
सध्या प्रत्येक घरात अशी एकही मुलगी नाही जी शाळेत जात नाही आणि शिक्षण घेत नाही. प्रत्येक मुलगी शिकून मोठं होण्याचं स्वप्न पाहत आहे. त्यामुळे घरी येणाऱ्या मुलींना तुम्ही महापुरुषांची पुस्तके देऊ शकता. यात महत्वाचे म्हणजे सावित्री बाई फुलेंचे पुस्तक तुम्ही मुलींना वाचण्यासाठी दिले पाहिजे.
मुलींना स्वत:कडे कितीही कपडे असले तरी ते कमीच पडतात. रोज नवीन कपडे परिधान करावेत असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे तुम्ही मुलींना या सर्व गिफ्ट्स व्यतिरिक्त सुंदर ड्रेस देऊ शकता. तुम्हाला ड्रेस देणे कठीण वाटत असेल तर मुलींसाठी तुम्ही सुंदर आणि युनिक स्टोल किंवा स्कार्फ खरेदी करू शकता. मुलींना असे गिफ्ट्स फार आवडतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.