Shardiya Navratri 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2023 : उपवासात गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय? दिवसाची सुरुवात या गोष्टींनी करा

Fasting Tips : नवरात्रीच्या उपवासाच्या 9 दिवसांमध्ये गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या तुम्हाला सतावू शकते.

Shraddha Thik

Shardiya Navratri Fasting Tips :

नवरात्रीच्या उपवासाच्या 9 दिवसांमध्ये गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या तुम्हाला सतावू शकते. वास्तविक, खाण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल, मिरची मसाला आणि कांदा-लसूण न खाल्ल्याने तुमच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि अनेक समस्या निर्माण होतात.

जसे की अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या समस्या (Problem) निर्माण होते. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येईल. तसेच उपवासाच्या वेळी तुम्ही एक गोष्ट सतत करत राहिल्यास या समस्येपासून दूर करू शकता.

उपवास करताना सकाळी नारळ पाणी घ्या

उपवासाच्या वेळी सकाळी (Morning) नारळपाणी घेतल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून बचाव होतो. नारळाचे पाणी तुमच्या पोटातील आम्लयुक्त पीएच संतुलित ठेवण्यास मदत करते. याशिवाय भरपूर पाणी असल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते, त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही. या व्यतिरिक्त ते बद्धकोष्ठता देखील प्रतिबंधित करते ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅसिडिटी देखील होऊ शकते.

जास्त चहा आणि कॉफी पिऊ नका

काही लोक उपवासात चहा-कॉफीचे जास्त सेवन करू लागतात. त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी (Acidity) होते. वास्तविक, कॅटेचिन अम्लीय पित्त रस वाढवते ज्यामुळे गॅस आणि ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उपवासाच्या वेळीही चहा-कॉफीच्या सेवनावर नियंत्रण ठेवा आणि दिवसातून दोनदाच घ्या.

दिवसाच्या सुरुवातीला ही एक गोष्ट करा

गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी दिवसाच्या सुरुवातीला काही पुदिन्याची पाने चावा. हे खाल्ल्याने तुमचा उपवास मोडणार नाही आणि तुम्हाला अ‍ॅसिडीटी आणि गॅसची समस्याही होणार नाही. याशिवाय आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे पुदिन्याची काही पाने साखरेच्या पाण्यामध्ये मिसळा आणि नंतर हा रस घ्या. असे केल्याने तुमचे पोट थंड होण्यासोबतच या समस्यांपासून वाचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT