Navratri Special Recipe 2022
Navratri Special Recipe 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Special Recipe 2022 : नवरात्रीच्या उपवासात खा; 'हा' स्पेशल रायता, अपचनाची समस्या होईल दूर !

कोमल दामुद्रे

Navratri Special Recipe 2022 : काही दिवसातच नवरात्री सुरु होणार आहे. या नऊ दिवसात नवदुर्गेची पूजा केली जाते. या दिवसात अनेक लोक व्रत करुन देवीची मनोभावे पूजा करतात.

नवरात्रीला (Navratra) उपवास ठेवणे शुभ मानले जाते आणि हिंदू भक्त देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी नऊ दिवस उपवास करतात. मात्र, उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये, याबाबत नेहमीच संभ्रम असतो. उपवास करताना पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आणि शरीराच्या उष्मांकाची गरज पूर्ण करणे तितकेच महत्वाचे आहे ज्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होणार नाही.

त्यासाठी रायता ही उत्तम व्रत रेसिपी आहेत कारण ती बनवायला सोपी, जास्त प्रथिने आणि फायबरने समृद्ध असलेली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल.

अननसाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये मँगनीज आणि कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. अननसमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे दमा आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते.

साहित्य:

अननसाचा प्लप - १/२ कप

साखर (Sugar) - १/४ कप

अननसाचे तुकडे - १ कप

ताजे दही - १ कप

भाजलेली जिरेपूड - १ मोठा चमचा

काश्मिरी लाल मिरची पावडर - १/२ चमचा

मीठ चवीनुसार

कृती

१. कढईत अननसाची प्युरी घालून थोडा वेळ फेटून घ्या. साखर घालून थोडावेळ उकळू द्या.

२. नंतर अननसाचे तुकडे घाला आणि त्याचा वास जाईपर्यंत उकळू द्या. गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.

३. १ कप दही घेऊन ते चांगले फेटून घ्या, त्यात थंड केलेले प्युअर केलेले अननस घाला. मीठ, भाजलेले जिरे आणि तिखट घाला.

४. चांगले मिसळा आणि थंड करा. बिर्याणी, पुलाव किंवा कोणत्याही पंजाबी पदार्थासोबत सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

SCROLL FOR NEXT