Heart attack symptoms saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack : लहान मुलांमध्ये हार्टअटॅकचा धोका वाढला, कारण काय? VIDEO

Heart Attack in children : लहान मुलांमधील हार्ट अटॅकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. नाशिकमधील शाळकरी मुलीसोबत घडलेल्या घटनेनं पालकांची चिंता आणखी वाढलीय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट..

Suprim Maskar

मैदानावर खेळताना किंवा जीममध्ये घाम गाळताना हृदयविकाराच्या झटका येऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. गंभीर बाब म्हणजे त्यामध्ये शाळकरी मुलेही आहेत. नाशिक शहरातील एका शाळेतही धक्कादायक घटना घडलीय. सकाळच्या सुमारास शाळेच्या गेटमधून आत जाणारी सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनी चक्कर येऊन मैदानात कोसळली. त्यानंतर शिक्षकांनी तिला रुग्णालयात नेलं. मात्र त्याआधीच या मुलीचा मृत्यू झाला...श्रेया किरण कापडी असं तिचं नाव आहे. श्रेयाला आधीपासूनच हृदयाचा त्रास होता.

याआधीही अशा घटना घडल्या आहेत. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील आदर्श विद्या मंदिर शाळेत 9 वर्षीय चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. तसचं 6 महिन्यांपूर्वी बंगळुरुमध्ये एका शाळेतही अशीच घटना घडली होती. आठ वर्षांची मुलगी बराच वेळ शाळेच्या आवारात उभी होती. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटल्यानं ती खुर्चीवर बसली.आणि तिथेच तिचा हार्ट अटॅकमुळे मृत्यु झाला..

लहान मुलांमधील हार्ट अटॅकचं वाढतं प्रमाण पाहता पालकांनीही सतर्क राहायला हवं...

लहान मुलांना हार्टअटॅकचा वाढता धोका

जन्मतःच हृदयात दोष मात्र वेळेवर निदान न झाल्यास गंभीर धोका

टीव्ही, मोबाईल स्क्रीन टाईम जास्त आणि त्यामुळे शारीरिक हालचाली नाही

संतुलित आहाराकडे दुर्लक्ष

जंक फूड, सॉफ्ट ड्रिंकमुळे आरोग्यावर विपरित परिणाम

वाढती स्पर्धा, अभ्यास, पालकांची अपेक्षा यामुळे मुलांवर तणाव

धाप लागणे, थकवा जाणवणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष

हार्ट अटॅक होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. मात्र पालकांनीच जबाबदारीचं भान राखून मुलांना नियमित व्यायाम आणि वागणुकीबाबत काही नियम घालून दिले तर याचं प्रमाण निश्चितच रोखता येईलं. अन्यथा चिमुरड्यांच्या आरोग्याकडे पालकांनी केलेलं दुर्लक्ष त्यांच्या मृत्यूच्या दाढेत ढकलू शकतं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT