Bad Breath After Brushing Saam Tv
लाईफस्टाईल

Bad Breath After Brushing : ब्रश केल्यानंतर सुद्धा तोंडाचा वास येतो? फॉलो करा 'या' टिप्स

बऱ्याचदा लोक ब्रश केल्यानंतर सुद्धा तोंडाचा वास येणाऱ्या समस्येसोबत झुंजत असतात.

कोमल दामुद्रे

Bad Breath After Brushing : जेव्हा आपल्या तोंडामधून दुर्गंध येतो तेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीसोबत बोलताना लाज वाटते. बऱ्याचदा लोक ब्रश केल्यानंतर सुद्धा या समस्येसोबत झुंजत असतात. बऱ्याचदा असं होण्याचे अनेक कारणे असू शकतात.

जसे की, पोट साफ न होणे, योग्यरित्या ब्रश न करणे वैगरे वैगरे. जर का कॉमन कारणांमुळे तोंडामधून दुर्गंध येत असेल तर, आम्ही तुम्हाला काही खास घरगुती टिप्स (Tips) सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या तोंडाचा दुर्गंध येणार नाही.

तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती टिप्स :

1. लवंग : जर अनेकवेळा ब्रश करून सुद्धा तुमच्या तोंडाचा वास येत असेल तर, तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा लवंग खाऊ शकता. लवंग तुमच्या तोंडामधील बॅक्टेरिया दूर करण्यास मदत करतो. त्याचबरोबर तुमच्या हे लक्षात असू दे की, जास्त प्रमाणात लवंग सेवन करणे हे तुमच्या आरोग्यास इजा पोहोचू शकते.

2. बडीशोप : तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटकारा मिळवण्यासाठी दररोज जेवणानंतर बडीशेप सेवन करा. बडीशोपमध्ये कुलिंग एजंट असतात जे पोटाला थंडावा देतात. ज्यामुळे तोंडाचा वास येत नाही. यासोबतच अन्न पचण्यासाठी बडीशेप फायदेशीर ठरते.

3. तुळस : औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली तुळसी आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर असते. तुळशीमध्ये उपलब्ध असणारे एंटीबॅक्टेरियल गुण दुर्गंध निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना मारून टाकते. तुळशीच्या एका पानाला पाण्याबरोबर गिळा.

Bad Breath

4. राईचे तेल (Oil) : राईचे तेल हे आपल्या आजीचे फेवरेट उपाय आहे. यासाठी राईच्या तेलामध्ये थोडासा मीठ मिसळून. बोटाच्या सहाय्याने आपल्या हिरड्यांना मसाज करा. असं केल्याने तुमच्या हिरड्या नेहमी मजबूत आणि हेल्दी राहतील. त्याचबरोबर तोंडामधून दुर्गंध येणार नाही.

5. मिठाचे पाणी (Water) : तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटकारा मिळवण्यासाठी तुम्ही मिठाच्या पाण्याने चूळ भरू शकता. यासाठी एकदाच पाण्यामध्ये एक चमचा मीठ मिसळावा. त्यानंतर या पाण्याने चूळ भरा. तुम्हाला ही क्रिया पाच ते सहा वेळा करायची असून दिवसामधून दोन वेळा करायची आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइननेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT