High Blood Pressure, How To Control High Blood Pressure Saam Tv
लाईफस्टाईल

सकाळी उठताच बॉडीमध्ये दिसताय ही लक्षणे? असू शकते High Blood Pressure ची समस्या, वेळीच घ्या काळजी

How To Control High Blood Pressure : वाढत्या ताणामुळे हल्ली प्रत्येक वयोगटातील तरुणांमध्ये रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागतो. रक्तदाबाची समस्या वाढण्याची अनेक कारणे आहे. हा आजार सायलेंट किलर मानला जातो. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात.

कोमल दामुद्रे

High Blood Pressure Symptoms :

वाढत्या ताणामुळे हल्ली प्रत्येक वयोगटातील तरुणांमध्ये रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागतो. रक्तदाबाची समस्या वाढण्याची अनेक कारणे आहे. हा आजार सायलेंट किलर मानला जातो. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात.

वाढत्या उच्च रक्तदाबामुळे (Blood Pressure) शरीराला हानी पोहोचू शकते. खराब जीवनशैली, ताणतणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मिठाचे अधिक प्रमाणात सेवन, कोलेस्टेरॉल, किडनी आणि यकृत, कमी झोप यामुळे उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागतो.

या आजारावर (Disease) वेळेत उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. उच्च रक्तदाबाच्या समस्येची लक्षणे (Symptoms) आधीपासून दिसू लागतात. याची लक्षणे वेळेच ओळखल्यास यावर मात करता येते. सकाळी झोपेतून उठताच क्षणी तुम्हाला ही लक्षणे दिसताच वेळीच काळजी घ्या.

1. चक्कर येणे

जर सकाळी झोपेतून उठल्यानंतर चक्कर आल्यासारखे किंवा थकवा आल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा सामना करावा लागतो.

2. सतत तहान लागणे

सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला सतत तहान लागत असेल तर काळजी करावी लागेल. तोंड कोरडे पडणे हे देखील उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. रोज सकाळी उठल्यानंतर असे घडत असेल तर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

3. मळमळणे

ऍसिडीटीच्या समस्येमुळे अनेकदा आपल्याला मळमळते. जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला असे होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. धुसर दृष्टी

सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल किंवा डोळ्यासमोर अंधारी येत असेल तर हे उच्च रक्तदाबाचे कारण असू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT