Morning Juice Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Juice : रोज सकाळी 'या' रसाचे सेवन केल्यास मधुमेहींसाठी ठरेल फायदेशीर !

ब्रोकोली ही पचनास हलकी असून अनेक पोषक तत्वांनी अशी समृध्द आहे.

कोमल दामुद्रे

Morning Juice : ब्रोकोलीची भाजी ही खाण्यास रुचकर जरी असली तरी तिचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. ब्रोकोली ही पचनास हलकी असून अनेक पोषक तत्वांनी अशी समृध्द आहे. (Latest Marathi News)

ब्रोकोलीच्या भाजीसोबतच तिच्या रसाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदा होतो. रोज सकाळी ब्रोकोलीचा ज्यूस सेवन केलात तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. ब्रोकोलीमध्ये प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, जीवनसत्त्व ए सोबत पॉलिफेनॉल असतात. याव्यतिरिक्त, त्यात फायबर आणि जीवनसत्त्व क देखील भरपूर आहे, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. जाणून घेऊया रोज सकाळी ब्रोकोलीचा ज्यूस पिण्याचे काय फायदे आहेत. (Benefits Of Broccoli )

1. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते-

शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढणे हे हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज सकाळी ब्रोकोलीचा रस प्यायल्याने फायदा होईल. ब्रोकोलीमध्ये फायबर आढळते, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

2. प्रतिकारशक्ती मजबूत करते -

ब्रोकोलीच्या रसामध्ये जीवनसत्त्व (Vitamins) क भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही रोज सकाळी ब्रोकोलीचा रस घेतला तर ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे शरीरत तयार होणारे विषाणू आणि बॅक्टेरियांना वाचवू शकतात.

3. मधुमेहामध्ये फायदेशीर -

ब्रोकोलीच्या रसाचे सेवन मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. कारण ब्रोकोलीच्या ज्यूसमध्ये अँटी-ऑक्सिडंट्ससोबतच फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे जर तुम्ही रोज सकाळी ब्रोकोलीचा रस प्यायला तर ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.

4. हाडे मजबूत ठेवते -

ब्रोकोलीच्या रसाचे सेवन हाडांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण ब्रोकोलीच्या ज्यूसमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ब्रोकोलीच्या रसाचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात आणि हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो.

5. त्वचेसाठी फायदेशीर -

ब्रोकोलीच्या रसाचे सेवन केल्याने त्वचेसोबतच आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. कारण ब्रोकोलीच्या ज्यूसमध्ये जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे जर तुम्ही रोज सकाळी ब्रोकोलीचा ज्यूस घेतला तर त्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचेला चमकही येते.

6. जळजळ होण्याची समस्या दूर होते -

शरीरात सूज किंवा वेदना होत असल्यास ब्रोकोलीचा रस रोज सकाळी प्यावा. कारण ब्रोकोलीच्या रसामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.

7. रक्ताची कमतरता -

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास ब्रोकोलीच्या रसाचे सेवन फायदेशीर मानले जाते. कारण ब्रोकोलीच्या रसामध्ये लोह आढळते. त्यामुळे रोज सकाळी ब्रोकोलीचा रस सेवन केल्यास हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT