Headache Problem Saam tv
लाईफस्टाईल

Headache Problem : सकाळी उठल्यानंतर अचानक डोके दुखू लागते, मायग्रेन तर नाही ना? कसे ओळखाल?

Migraine Symptoms : हिवाळ्यामध्ये वातावरण अधिक प्रमाणात थंड असते. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या अधिक प्रमाणात सतावते. अनेकदा सकाळी उठल्यानंतर डोक जड वाटू लागते किंवा दुखू लागते.

कोमल दामुद्रे

Migraine :

वातावरणात बदल झाला की, आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. हिवाळा सुरु झाला की, वातावरणात गारवा पसरतो ज्यामुळे आरोग्य बिघडते. हिवाळ्यामध्ये वातावरण अधिक प्रमाणात थंड असते. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या अधिक प्रमाणात सतावते.

अनेकदा सकाळी उठल्यानंतर डोक जड वाटू लागते किंवा दुखू लागते. ही डोकेदुखी थांबत नाही ज्यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते. अनेकांना मायग्रेनच्या आजाराला बळी पडावे लागते. जसजशी थंडी वाढू लागते. तसतसा मायग्रेनचा आजार अधिक धोकादायक बनतो. जाणून घेऊया या आजारावर कशी मात करायची.

1. हिवाळ्यात मायग्रेन का होतो?

तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात (Winter Season) मायग्रेनची स्थिती बॅरोमेट्रिक प्रेशरमध्ये बदल झाल्यामुळे वाईट होते. ज्यामुळे मेंदूच्या वाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे मायग्रेनची समस्या सुरु होते. हिवाळ्यात मायग्रेन टाळण्यासाठी गारव्याचा संपर्क टाळा, हायड्रेट ठेवा, पुरेशी झोप घ्या.

2. स्ट्रेस मॅनेज करा

बदलेल्या जीवनशैलीनुसार सध्या तरुण पिढी तणावाच्या (Stress) वातावरणमुळे त्रस्त आहे. यासाठी तुम्हाला श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यानधारणा यांसारख्या गोष्टी कराव्या लागतील.

3. झोपेची पद्धत

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे झोपेवर अधिक परिणाम होतो. अनियमित झोपेमुळे मायग्रेनचा त्रास उद्भवतो. त्यासाठी नियमितपणे ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.

4. हायड्रेट राहा

शरीरात पाण्याची (Water) कमतरता झाल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. मायग्रेनची समस्या ही डिहायड्रेशनमुळे उद्भवते. त्यासाठी दिवसांतून किमान ८ ग्लास पाणी प्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT