Chandra Grahan 2024, Chandra Grahan 2024 Date in India, Lunar eclipse 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Chandra Grahan 2024 : मार्च महिन्यात असणार वर्षातले पहिले चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार? जाणून घ्या

Chandra Grahan 2024 Date in India :वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे मार्च महिन्यात असणार आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच सोमवारी २५ मार्च २०२४ ला चंद्रग्रहण असणार आहे.

कोमल दामुद्रे

Lunar eclipse 2024 :

वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे मार्च महिन्यात असणार आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच सोमवारी २५ मार्च २०२४ ला चंद्रग्रहण असणार आहे.

विज्ञानात ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते. चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येते. तसेच चंद्रग्रहण हे छायाकल्प, खंडग्रास किंवा खग्रास असते. पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळी आकाशात चंद्र दिसतो त्यावेळी चंद्रग्रहण होते. हे ग्रहण वैज्ञानिक आणि धार्मिकतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी राहू चंद्राच्या जवळ आल्यामुळे अनेक राशींना याचा त्रास सहन करावा लागतो. हे चंद्रग्रहण कधी आहे? कुठे दिसणार? जाणून घेऊया सविस्तर

1. २०२४ मधील पहिलं चंद्रग्रहण कधी?

वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे २५ मार्च रोजी असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात (India) दिसणार नाही. सकाळी १०.२३ पासून सुरु होईल तर दुपारी ०३. ०२ पर्यंत असणार आहे.

2. चंद्रग्रहण कुठे दिसणार?

२५ मार्चला होळी (holi Festival) असल्यामुळे हे चंद्रग्रहण आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड, बेल्जियम, नॉर्वे, स्वित्झर्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक या देशांमध्ये दिसणार आहे. आणि अंटार्क्टिकासारख्या शहरांमध्ये दिसेल.

3. होळीवर चंद्रग्रहणाचे सावट?

पंचागानुसार होळी २४ मार्चला असणार आहे तर २५ ला धूलिवंदन आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हे चंद्रग्रहण दिसणार आहे. ही पौर्णिमा २४ मार्च रोजी रात्री ०९.५७ मिनिटांनी सुरु होईल आणि २५ मार्च रोजी रात्री १२.३२ मिनिटांनी संपणार आहे. यंदा होळीच्या सणावर चंद्रग्रहणांचे सावट असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT